आत्महत्येची धमकी देत पंधरावर्षीय मुलीवर परिचितानेच केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:41 IST2018-11-18T00:41:04+5:302018-11-18T00:41:23+5:30

माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत २५ वर्षीय विवाहित नराधमाने पंधरावर्षीय शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार केल्याचे समोर आले. छावणी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही आरोपी व त्याच्या नातलगांनी मारहाण करीत आरोपीला साथ दिली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

 The atrocities committed by the acquaintance of the 15-year-old girl threatening suicide | आत्महत्येची धमकी देत पंधरावर्षीय मुलीवर परिचितानेच केले अत्याचार

आत्महत्येची धमकी देत पंधरावर्षीय मुलीवर परिचितानेच केले अत्याचार

ठळक मुद्देछावणी पोलिसांनी ठोकल्या नराधमाला बेड्या: सहा महिन्यांपासून करीत होता अत्याचार, आरोपीच्या नातेवाईक महिलांनी दिली आरोपीला साथ

औरंगाबाद : माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन, अशी धमकी देत २५ वर्षीय विवाहित नराधमाने पंधरावर्षीय शाळकरी मुलीवर सहा महिने अत्याचार केल्याचे समोर आले. छावणी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडितेच्या आईलाही आरोपी व त्याच्या नातलगांनी मारहाण करीत आरोपीला साथ दिली. याप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
सागर श्रीसुंदर (२५, रा. छावणी परिसर), असे आरोपी नराधमाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, छावणी परिसरातील रहिवासी पंधरावर्षीय मुलगी दहाव्या वर्गात शिकत आहे. तिच्या वसाहतीत सागर राहतो. तो विवाहित असून, त्याला एक मुलगी आहे. शाळेत येता-जाता आरोपी तिचा रस्ता अडवून तू खूप सुंदर आहेस, माझ्याशी लग्न कर, नाही तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या घरच्यांना जेलमध्ये टाकीन, अशी धमकी देत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिला अडविले आणि स्वत:च्या वाहनावरून विविध ठिकाणी फिरवले. त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला धमकावत तिच्यावर अत्याचार केले. ही बाब आरोपीच्या नातेवाईकांना माहीत होती. असे असूनही त्यांनी त्याला पाठीशी घातले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे पीडितेचे अभ्यासात लक्ष लागेना. शिवाय ती सतत घाबरल्यासारखी राहत असे. हे तिच्या आईच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने रडतच तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पीडितेला सोबत घेऊन छावणी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांसह आरोपींविरोधात बलात्कार करणे, मारहाण करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरवसे यांनी आरोपीला अटक केली.

पीडितेच्या मातेलाच केली मारहाण
आपल्या मुलीवर नराधम सागरने अत्याचार केल्याचे कळताच संतप्त झालेल्या मातेने थेट आरोपीचे घर गाठून त्याच्याकडे जाब विचारला. तेव्हा आरोपीसह त्याचे नातेवाईक आशू आवळे आणि पाच महिलांनी मायलेकींना दूषणे देत शिवीगाळ करून मारहाण केली.

Web Title:  The atrocities committed by the acquaintance of the 15-year-old girl threatening suicide

टॅग्स :Policeपोलिस