नराधम बापाचाच मुलींवर अत्याचार

By Admin | Updated: May 15, 2014 00:27 IST2014-05-15T00:26:43+5:302014-05-15T00:27:00+5:30

औरंगाबाद : जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.

Atrocities against Narada Bapacha girls | नराधम बापाचाच मुलींवर अत्याचार

नराधम बापाचाच मुलींवर अत्याचार

औरंगाबाद : जन्मदात्या बापानेच आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. त्याची विकृती एवढी टोकाला गेली की, मुलींचा गर्भपात करून त्याने त्याची अश्लील चित्रफीतही तयार केली. रक्ताच्या नात्याला काळिमा फासणार्‍या नराधमाच्या विरोधात पीडित मुलींच्या आईनेच परभणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचे धाडस केले. गुन्हा औरंगाबाद शहरात घडल्याने पोलिसांनी तो नंतर सिटीचौक ठाण्यात वर्ग केला. पोलिसांनी विकृत मनोवृत्तीच्या नराधमाला बेड्या ठोकल्या. अंगाला शहारे आणणार्‍या घटनेचा तपशील असा की, वाळूज औद्योगिक परिसरात एका नामांकित कंपनीत कार्यरत असलेला सुरेश (वय ४६, नाव बदलेले आहे.) हा दिवाण-देवडी भागात राहतो. १९९३ साली त्याचा विवाह झाला. लग्नात ठरलेला हुंडा आणत नाही म्हणून तो सतत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. लग्नानंतर सुरेशला दोन मुली झाल्या. सुरुवातीची काही वर्षे सुरेश फक्त पत्नीलाच त्रास देत होता. त्याची मोठी मुलगी आठवीत शिकत होती. (आठ वर्षांपूर्वी) तेव्हा पत्नी घराबाहेर गेल्यानंतर सुरेशने मोठ्या मुलीला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. सुरेशचे हे दुष्कृत्य मागील काही वर्षांपासून सुरू होते. सुरेशचे धाडस हळूहळू वाढू लागले. त्याने लहान मुलीलाही धमकावून नीच कृत्य केले. त्याच्या या वारंवार होणार्‍या अत्याचाराने एका मुलीला दिवस गेले. सुरेशने आपले हे पाप लपविण्यासाठी औषध पाजून तिचा गर्भपात केला. या घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये, म्हणून त्याने दोन्ही मुलींची स्वत:च्या मोबाईलवर अश्लील चित्रफीत बनविली. ही चित्रफीत त्याने घरातील संगणकात अपलोड केली. त्यानंतर या चित्रफितीच्या सीडी तयार केल्या. त्याच्या या अत्याचाराला कंटाळून त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन परभणी येथे राहण्यास निघून गेली. तेथेही जाऊन तो त्यांच्यावर अत्याचार करू लागला. त्यास विरोध करणार्‍या मुली आणि पत्नीला तो जिवे मारण्याची धमकी देत असे. त्याच्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या पत्नीने सुरेशच्या विरोधात परभणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. नंतर परभणी पोलीस अधीक्षकांनी गुन्हा सिटीचौक पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. या गंभीर घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या महिलांविषयक विशेष पथकाच्या निरीक्षक अर्चना पाटील यांच्याक डे सोपविला. आरोपी नराधमाला अटक करण्यात आली आहे. पिता म्हणविणारा हा इसम इतका पिसाट झाला होता की, त्याला आपल्या पोटच्या मुली असल्याचेही भान राहिले नाही. मुलींवर अत्याचार करणारा केवळ विकृतच असू शकतो, असे तपास करणार्‍या पोलिसांना वाटते. हा इसम असा का वागला याचा आता पोलीस शोध घेत आहेत. सुरुवातीची काही वर्षे सुरेश फक्त पत्नीलाच त्रास देत होता. नंतर केले मुलींवर अत्याचार. पाप लपविण्यासाठी औषध पाजून तिचा गर्भपात केला. घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये, म्हणून त्याने दोन्ही मुलींची स्वत:च्या मोबाईलवर अश्लील चित्रफीत बनविली. अत्याचाराने त्रस्त झालेल्या पत्नीने सुरेशच्या विरोधात परभणी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

Web Title: Atrocities against Narada Bapacha girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.