शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीचे वातावरण थंडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2016 01:15 IST

हिंगोली : नगरपालिका निवडणुकीचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होेणे अपेक्षित असताना वातावरण अचानकच थंड झाले आहे.

हिंगोली : नगरपालिका निवडणुकीचा बिगूल कधीही वाजू शकतो. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली गतिमान होेणे अपेक्षित असताना वातावरण अचानकच थंड झाले आहे. पक्षीय बैठकांमध्येही काही दम उरला नाही. ना कुठे कार्यकर्त्यांचा लवाजमा ना तयारीसाठी नेतेमंडळींची लगबग. काहींचे तर नगराध्यक्षपदाचे उमेदवारही अजून बिळाबाहेर निघाले नाहीत.हिंगोली नगरपालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला पक्षीय नव्हे, तर अपक्ष म्हणून का होईना रिंगणात उतरण्याची संधी आहे. प्रमुख राजकीय पक्षांचीच प्रभागातील जोडी जुळविण्यातच दमछाक होत आहे. तसेही हिंगोली पालिकेत पक्षीय बलाबलात यापूर्वी तरीही राष्ट्रवादी वगळता इतर कुणाचाही दुहेरी आकडा नाही. आता सर्वांनाच दुहेरी आकडा गाठण्याची आस आहे. त्यासाठी उमेदवार शोधण्यासाठी कवायती सुरू आहेत. उमेदवारही चलाखी करीत आहेत. सकाळी एका तर रात्री दुसऱ्या तंबूत जागरण करीत फिरत आहेत. त्यामुळे निवडणुकीचा अर्ज भरून एबी फॉर्म कुणाचा स्वीकारला हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय अशांचा भरवसा श्रेष्ठींनाही पटणार नाही, अशी गत आहे. एवढे वातावरण गढूळ झालेले असताना काँग्रेस व भाजप या राष्ट्रीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, हेही तेवढेच खरे. सत्ताधारी म्हणून राष्ट्रवादीसमोर प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आधीपासूनच आहे. अधिक वेगवान घडामोडी आचारसंहिता लागल्यानंतर पहायला मिळतील, असे दिसते. त्यामुळे वादळापूर्वीची ही शांतता असल्यासारखे चित्र आहे. आता राकाँ-१५, शिवसेना-५, मनसे-३, काँग्रेस-३, भाजप-२ असे चित्र आहे. प्रयत्न तर सर्वच करत आहेत. मात्र त्यात कोणाचे बळ वाढते व कोणाचे कमी होणार? हे काळच सांगेल. (जिल्हा प्रतिनिधी)