अधीक्षकांकडून मागविला खुलासा

By Admin | Updated: July 23, 2014 00:34 IST2014-07-22T23:52:26+5:302014-07-23T00:34:52+5:30

जालना : नगरभूमापन कार्यालयातून पीआरकार्ड देण्यास अडवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारच्या अंकात प्रकाशित केले होते

Asked by superintendent to reveal | अधीक्षकांकडून मागविला खुलासा

अधीक्षकांकडून मागविला खुलासा

जालना : नगरभूमापन कार्यालयातून पीआरकार्ड देण्यास अडवणूक होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ ने स्टिंग आॅपरेशनद्वारे मंगळवारच्या अंकात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नगर भूमापन विभागाच्या अधीक्षकांकडून यासंबधीचा खुलासा मागविला आहे.
सेतू सुविधा केंद्रातून पीआर कार्ड देण्याची पद्धत आहे. मात्र येथील प्रशासकीय इमारतीच्या आवारात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात अर्ज भरून घेतात, पीआर कार्ड कधी देणार त्याची तारीखही देतात. मात्र जेव्हा पीआर कार्ड घेण्यासाठी नागरिक जातात, तेव्हा त्यांना नगर भूमापन कार्यालयाचा रस्ता दाखविला जातो.
या कार्यालयात गेल्यानंतर नागरिकांची अडवणूक केली जाते. दलालांमार्फत पैसे गोळा करून नंतरच पीआरकार्ड दिल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मंगळवारीही अशा तक्रारी करण्यात आल्या.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी नगर भूमापन विभागाच्या अधीक्षकांकडूनच खुलासा मागविला आहे. पीआर कार्डचे वितरण पूर्वीप्रमाणेच सेतू सुविधा केंद्रातून केले जावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)
पीआरकार्ड प्रकरण
मंगळवारी नगर भूमापन कार्यालयात चक्कर मारली असता पीआरकार्ड बाबतची परिस्थिती ‘जैसे थे’ होती. कॉम्प्युटर खराब असल्याने पीआरकार्ड मिळणार नाही, असे कर्मचारी सांगत होते.

Web Title: Asked by superintendent to reveal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.