सात हजार हजार रुपये लाच मागितली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:20 IST2021-02-05T04:20:33+5:302021-02-05T04:20:33+5:30
हवालदारासह ॲपेचालकावर गुन्हा एसीबीची कारवाई : आरोपी हवालदार करमाड ठाण्यात कार्यरत औरंगाबाद : पत्नीचा छळ केल्याच्या गुन्ह्यात मदत ...

सात हजार हजार रुपये लाच मागितली
हवालदारासह ॲपेचालकावर गुन्हा
एसीबीची कारवाई : आरोपी हवालदार करमाड ठाण्यात कार्यरत
औरंगाबाद : पत्नीचा छळ केल्याच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या करमाड ठाण्यातील हवालदारासह त्याच्यासाठी तक्रारदाराकडे लाचेचा तगादा लावणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला.
पोलीस हवालदार सिराज इकबाल पठाण आणि ॲपेरिक्षाचालक युवराज नाथा मुळे अशी आरोपींची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुणाविरोधात त्याच्या पत्नीने करमाड ठाण्यात छळाची तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार सिराज पठाण आणि रिक्षाचालक यांनी एकत्रित सात हजार रुपये लाच मागितली. तक्रारदाराने याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पकडण्यासाठी वेळोवेळी सापळा रचला; मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी तक्रारदार यांच्याकडून लाच घेतली नाही. यामुळे दोन्ही आरोपीविरुद्ध एसीबीने लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविला.