आष्टी तालुक्यात गावठी दारुमुळे दोघांचा बळी

By Admin | Updated: January 13, 2015 00:14 IST2015-01-12T23:48:34+5:302015-01-13T00:14:47+5:30

आष्टी : तालुक्यातील कडा येथे गावठी दारूची बेकायदा विक्री होत असून यामुळे दोघांचा बळी गेल्याची तक्रार अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे ग्रामस्थांनी सोमवारी केली़

In Ashti taluka, a victim of dowry was killed due to dud | आष्टी तालुक्यात गावठी दारुमुळे दोघांचा बळी

आष्टी तालुक्यात गावठी दारुमुळे दोघांचा बळी


आष्टी : तालुक्यातील कडा येथे गावठी दारूची बेकायदा विक्री होत असून यामुळे दोघांचा बळी गेल्याची तक्रार अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे ग्रामस्थांनी सोमवारी केली़
२ जानेवारी २०१५ रोजी अंबादास कुसळकर तर ४ जानेवारी २०१५ रोजी राम शिरोळे यांचा गावठी दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे़ नवसागर, काळा गूळ, नासकी फळे, घातक रसायने यापासून गावठी दारू बनवून राजरोस विक्री केली जाते़ त्यामुळे अनेकांचे संसार उध्दवस्त होत असल्याचे बाळू शिरोळे, लाला शिरोळे, संगीता शिरोळे, तानाबाई कांबळे, सुदाम शिरोळे, गोपीनाथ कुसळकर यांनी म्हटले आहे़ अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणीही करण्यात आली़ विक्रेत्यांना पोलिसांचाच आशीर्वाद असल्याचा आरोपही आहे़
निरीक्षक दिनेश आहेर म्हणाले, आरोप तथ्यहीन आहेत, कारवाया सुरू आहेत़ (वार्ताहर)

Web Title: In Ashti taluka, a victim of dowry was killed due to dud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.