१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली
By Admin | Updated: May 12, 2014 00:01 IST2014-05-11T23:48:05+5:302014-05-12T00:01:31+5:30
चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही.

१० लाख खर्चानंतरही आश्रमशाळा तहानलेली
चंद्रमुनी बलखंडे , आ. बाळापूर कळमनुरी तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्यापही कायमस्वरुपी पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. विशेष म्हणजे याच शाळेत पावणेसात लाख रुपयांची विहीर खोदल्याची माहिती बेलथर येथील कार्यकर्ते राजू पाईकराव यांनी माहितीचा अधिकार कायद्यानुसार केलेल्या अर्जातून पुढे आली आहे. त्यामुळे ठक्करबाप्पा योजनेतून ६ लक्ष ८४ हजार रुपयांची खोदलेली विहीर कोठे गेली? असा प्रश्न विचारला जात असून आता शाळेसाठी अधिग्रहण केलेल्या पाण्याच्या रक्कमेसह दहा लाख रुपये खर्च होवूनही शाळा मात्र तहानलेलीच राहिली आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची सोय तालुक्यातच उपलब्ध व्हावी म्हणून कळमनुरी तालुक्यातील गोटेवाडी येथे आदिवासी आश्रमशाळा उभारण्यात आली. या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी सुविधा देण्याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. दर्जेदार शिक्षण व सोयीसुविधा जाग्यावरच उपलब्ध व्हाव्यात, हाच या मागचा उद्देश आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून पाण्याची कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पाण्यासाठी राजकारण करीत लाखो रुपये घशात घातल्याचेही उघड झाले आहे. बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य पाईकराव यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पाण्यासाठी कोणती योजना उपलब्ध आहे, याबाबत माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंतची माहिती विचारली होती. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल अथवा विहीर उपलब्ध नसल्याचे लेखी दिले. पाणी उपलब्ध नसल्याने पाणी अधिग्रहण करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिग्रहणाच्या पाण्यापोटी ३ लाख १३ हजार रुपये दिल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले. विशेष म्हणजे याच शाळेसाठी ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहीर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही माहितीही मिळाली. मात्र प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. या सर्व प्रकाराची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेल्या १० लाखांची वसूली करावी व गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करीत पाईकराव यांनी बीडीओंना निवेदन दिले आहे. आदिवासी मुलांसाठी शिक्षणाची तसेच निवासी राहण्यासाठी कळमनुरी तालुक्यातीलच गोटेवाडी येथे असलेल्या पहिली ते दहावीपर्यंत आश्रमशाळेला शासनाकडून उपलब्ध होतो मोठ्या प्रमाणात निधी विद्यार्थ्यांसाठी मागील तीन वर्षांपासून कायमस्वरुपी पाणी उपलब्ध नसल्याचे आले समोर बेलथर येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी माहिती अधिकारान्वये २०१३ पर्यंत मागविलेल्या माहिती अधिकारात पाण्यासाठी राजकारण करीत लाखों रुपये घशात घातल्याचेही आले समोर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ११ सप्टेंबर २०१३ रोजीपर्यंत बोअरवेल वा विहीर उपलब्घ नसल्याचे दिले होते लेखी शाळेने ६ लक्ष ८४ हजार रुपयांची विहिर ठक्कर बाप्पा योजनेतून खोदल्याचीही मिळाली माहिती. प्रत्यक्षात या विहिरीच्या पाण्याचा एक थेंबही शाळेला मिळाला नाही. याची चौकशी करून पाण्यापोटी खर्चलेली १० लक्ष रुपयांची वसुली करावी व आरोपींवर दाखल करण्याची मागणी होत आहे मी नुकताच पदभार स्वीकारला असल्यामुळे याबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे यापूर्वी येथे असलेल्या ग्रामसेवकाकडून माहिती घेवून त्याबाबत सांगता येईल. - आर.एन. घुगे, ग्रामसेवक, आखाडा बाळापूर