शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 19:49 IST

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे.

ठळक मुद्दे२५ आणि २६ रोजी औरंगाबादेत आयोजन जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत समारोप

औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे. या संमेलनाची माहिती देण्यासाठी मसाप आणि लोकसंवाद फाउंडेशनच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. मसापचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र कालुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. करपे म्हणाले, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ. सतीश चव्हाण, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे उपस्थित असणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. नियोजनासाठी २५ समित्या बनविण्यात आल्या असून, याशिवाय मुख्य आयोजक समितीही कार्यरत आहे. संमेलनात ज्वलंत विषयावर ४ परिसंवाद, दोन कविसंमेलने, एक कथाकथन, मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ. करपे यांनी सांगितले. मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी लोकसंवादच्या बैठकीत डॉ. राजेश करपे यांची बहुमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केल्याचे सांगितले. यावेळी आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव, सदस्य डॉ. रविकिरण सावंत, प्रा. अर्जुन मोरे, प्रा. बंडू सोमवंशी उपस्थित होते.

२० वर्षांनंतर औरंगाबादेत संमेलनमराठवाडा साहित्य संमेलन २००१ नंतर तब्बल २० वर्षांनी औरंगाबाद शहरात होत असल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. देगलूरचे संमेलन रद्द झाल्यामुळे तरुण रक्ताच्या युवा प्राध्यापकांना संमेलन आयोजित करण्याची संधी दिली. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक बाबू बिरादर असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे लवकर घेण्यात येत असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांमुळेच राजकीय नेत्यांना बंदीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना बोलावल्यास प्रसारमाध्यमे त्यांच्या भाषणालाच महत्त्व देतात. आमच्या साहित्यिकांना प्रसारमाध्यमात स्थान मिळत नाही. त्यामुळे त्या व्यासपीठावर बंदी घालण्याची भूमिका घेतली. मात्र मराठवाडा साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचा वावर पहिल्यापासूृन असून, तो यापुढेही कायम राहील, असेही ठाले यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : - मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता- संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत 

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा