शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात तब्बल १ हजार जेसीबी दाखल, पण खेळण्यातील; नागरिकांमध्ये कुतूहल

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 1, 2025 19:38 IST

जेसीबी काही अतिक्रमण पाडण्यासाठी किंवा खोदकाम करण्यासाठी नव्हे तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणले आहेत...

छत्रपती संभाजीनगर : शहरात एकसाथ तब्बल १ हजार जेसीबी दाखल झाले आहेत. देशाची राजधानी नवी दिल्ली येथून हा जेसीबीचा ताफा आला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जेसीबी शहरात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला या जेसीबींची पार्किंग करण्यात आली असून येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी हे जेसीबी कुतूहलाचा विषय बनले आहेत.

जेसीबी काही अतिक्रमण पाडण्यासाठी किंवा खोदकाम करण्यासाठी नव्हे तर लहान मुलांना खेळण्यासाठी आणले आहेत... मध्य प्रदेशातील १० विक्रेते हे जेसीबी शहरात घेऊन आले आहेत. तीन वर्षांपूर्वी शहरात सर्वप्रथम खेळणीतील नॅनो ट्रॅक्टर दाखल झाले होते. त्यानंतर हायवा, जीप, बस आणि आता जेसीबीची खेळणी आली आहे.

मेड इन दिल्ली जेसीबीछत्रपती संभाजीनगरात आणण्यात आलेल्या जेसीबी या खेळणीचे उत्पादन दिल्ली राज्यात होत आहे. दिल्ली व आसपासच्या परिसरात खेळणी उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. टॉय असोसिएशन ऑफ इंडियाच्या मध्ये देशात खेळणी बनविणारे ६ हजारांपेक्षा अधिक युनिट कार्यरत आहेत. त्यातील फक्त १५०० युनिटने ‘बीआयएस’ प्रमाणपत्र घेतले आहे. देशात आजघडीला गुजरात टॉय मॅन्युफॅक्चरिंगचा सर्वांत मोठा हब बनला आहे.

खेळणी उत्पादनात स्टार्टअपला वावखेळणी निर्माण क्षेत्रात स्टार्टअपला मोठा वाव आहे. छत्रपती संभाजीनगर औद्योगिक वसाहतीत खेळणी निर्माण उद्योग उभारले, तर अनेकांना रोजगार मिळू शकेल. नवउद्योजकांनी यादृष्टीने विचार करायला हवा, रस्त्यावरील खेळणी ‘बीआयएस’ प्रमाणित नसते. खेळणी घेताना याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.- अजय शहा, वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र कॅट.

भारताच्या खेळण्या ३३ देशात निर्यात :१) पूर्वी भारतात खेळणी बाजारपेठेत मेड इन चायनाचा दबदबा होता.२) केंद्र सरकारने भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी व निर्यात वाढविण्यासाठी बेसिक कस्टम्स ड्यूटी ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली.३) देशात ‘बीआयएस’ मानांकन लागू झाल्याने चीनहून आयात घटली आहे.४) वर्ष २०१५ ते २०२३ दरम्यान भारतात निर्मित खेळण्यांच्या निर्यातीत २३९ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. आयातीत ५२ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.५) ‘मेड इन इंडिया खेळण्या’ जगातील ३३ देशांत निर्यात होत आहेत.६) मार्केट रिसर्च फर्म ‘आयएमएआरसी’च्या रिपोर्टनुसार भारतातील टॉय इंडस्ट्रीची व्हॅल्यू मागील वर्षी १.७ अरब डॉलर होती. २०३२ पर्यंत ४.४ अरब डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर