शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महागाईचा परिणाम? ... गोडेतेलाचा टँकर पलटी होताच स्थानिकांची भांडे घेऊन गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 14:04 IST

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली.

अपघाताच्या घटनांनंतर लोकांनी अपघातस्थळावरुन कोंबड्या, बिअरच्या बाटल्या आणि मोबाईल एसेसिरीज पळवल्याचे आपण पाहितं होतं. आता, औरंगाबादच्या आडूळजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर देखील असाच काही प्रकार पाहायला मिळाला. औरंगाबादकडून बीडकडे गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यानंतर, स्थानिकांनी या टँकरमधील तेल घरी घेऊन जाण्यासाठी एकच गर्दी केली होती. वाढत्या महागाईमुळे म्हणा की लोकांना फुकटचं काहीही चालतं म्हणून म्हणा, पण लोकांची ही कृती व्हायरल झाली आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ही घटना मंगळवारी आडूळ येथील बाह्यवळणावर घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, औरंगाबादकडून बीडकडे (जी.जे. 12. बी. एक्स-6442) हा टँकर गोडतेल (खाद्यतेल) घेऊन जात होता. आडूळ येथील बाह्यवळणावर येताच समोर जाणाऱ्या वाहनचालकाने टँकरला हुलकावणी दिली. त्यामुळे समोरील वाहनाला वाचविण्याच्या नादात टँकर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि तेलाने भरलेला हा टँकर रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. याबाबत माहिती मिळताच, स्थानिकांनी मिळेत ते भांडे घेऊन टँकरस्थळी धाव घेतली. 

रजापूर, थापटी, आडूळ, देवगाव आदी आसपासच्या गावातील काही लोकांनी टॅकरच्या दिशेने धाव घेत तोबा गर्दी केली. पाण्याच्या टाक्या, डबे, पाण्याचे जार, बादल्या तर कुणी पातेले घेऊन टॅकरच्या दिशेने धावत होते. फुकटचे तेल मिळविण्यासाठी सर्वांचीच धडपड दिसून येते होती. कोणी म्हणत होते, तेलाचे भाव कसले वाढलेत माहितीय का?, अशा चर्चांमधून महागाईचाही अंदाज लावता येत होता. दरम्यान, याठिकाणी काही काळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात झाली असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडियाOil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पAccidentअपघात