इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी जिंकली औरंगाबादकरांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 22:22 IST2018-12-20T22:21:54+5:302018-12-20T22:22:19+5:30
इच्छामरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर परखडपणे भाष्य करणाऱ्या ‘पन्नादाई’ या नाटकाचा प्रयोग तापडिया नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आला. या नाटकासाठी इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी औरंगाबादकरांची मने जिंकली.

इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी जिंकली औरंगाबादकरांची मने
औरंगाबाद : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) औरंगाबाद शाखेतर्फे इच्छामरणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर परखडपणे भाष्य करणाऱ्या ‘पन्नादाई’ या नाटकाचा प्रयोग तापडिया नाट्यमंदिर येथे सादर करण्यात आला. या नाटकासाठी इंग्लंडहून आलेल्या कलावंतांनी औरंगाबादकरांची मने जिंकली.
नाटकातील सर्व पात्र- दिग्दर्शक, लेखक, नेपथ्य हे सर्व रंगमंच इंग्लंडस्थित हौशी नाट्यरसिकांचा ग्रुप आहे. शहरात प्रथमच अशा प्रकारच्या नाटकाचे आयोजन केले होते. नाट्यरसिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. नाटक संपल्यानंतरदेखील इच्छामृत्यूविषयी उपस्थितांच्या मनात असणाºया वेगवेगळ्या शंकांविषयी नाटकांच्या चमूला प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नोत्तराचा तास सुमारे अर्धा ते पाऊण तास रंगला. नाट्य कलावंतांनी उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निराकरण केले.
यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांची, डॉक्टरांची उपस्थिती होती. ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. कुलदीपसिंग राऊळ आणि सचिव डॉ. यशवंत गाडे यांनी सामाजिक प्रश्नांना हात घालणाºया नाटकांचे आयोजन यापुढेही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे सहसचिव डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. रमेश रोहिवाल, डॉ. संदीप मुळे, डॉ. अमोल देशमुख आदींनी परिश्रम घेतले.