शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

मुद्रांकाच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:31 IST

शहरातील विक्रेते स्टॅम्प पेपरचा तुटवडा असून, वरूनच आले नाही तर कोठून देणार, असे सांगत आहेत

ठळक मुद्देपीक कर्जासाठी कागदपत्रांत शेतकऱ्यांना १०० रुपयांचा मुद्रांक अत्यावश्यक करण्यात आलेला आहे. जास्तीचे दाम मोजल्यास मात्र स्टॅम्प पेपर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

- संजय जाधव पैठण : मुद्रांकासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असून, कृत्रिम टंचाईच्या नावाखाली मुद्रांक ग्राहकांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्याचा प्रकार सध्या पैठण शहरात जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगत आहेत, तर दुसरीकडे शहरातील विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वीच ५ हजार स्टॅम्प पेपर वितरित करण्यात आल्याचे कोषागार कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

पीक कर्जासाठी कागदपत्रांत शेतकऱ्यांना १०० रुपयांचा मुद्रांक अत्यावश्यक करण्यात आलेला आहे. यामुळे तालुकाभरातील शेतकऱ्यांची स्टॅम्प पेपर खरेदीसाठी लगबग सुरू आहे. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांनाही स्टॅम्प पेपरची सध्या गरज आहे. अशा परिस्थितीत पैठण शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपयांचा स्टॅम्प शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत असून, अडवणूक केली जात आहे. जास्तीचे दाम मोजल्यास मात्र स्टॅम्प पेपर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक कर्जासाठी बँकेने स्टॅम्प पेपर अनिवार्य केल्याने मजबूर होत जास्तीचे दाम मोजून शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरची खरेदी करावी लागत आहे. काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाडे यांना सोमवारी पैठण शहरात १०० रुपयांचा स्टॅम्प मिळाला नाही. नवगावचे गणेश राक्षे यांनाही स्टॅम्प मिळाला नाही.

शहरातील विक्रेत्यांनी स्टॅम्प पेपरचा तुटवडा असून, वरूनच आले नाही तर कोठून देणार, असे सांगितले. वकिलासाठी स्टॅम्प पेपर खरेदीसाठी गेलेल्या तरुणास स्टॅम्प पेपर नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वकिलाचे नाव सांगताच पटकन १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर हातात मिळाला. काही शेतकरी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदीसाठी औरंगाबादला गेले. मात्र, तेथेही त्यांना स्टॅम्प पेपर मिळाला नाही. याबाबत काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाडे यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी व पैठणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पैठण शहरात ३९०० स्टॅम्प पेपर वितरितपैठण शहरात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची टंचाई आहे का, याबाबत पैठण कोषागार कार्यालयाचे उपकोषागार अधिकारी संजय ठेणगे यांना विचारले असता पैठण शहरातील आठ विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वी ३९०० स्टॅम्प पेपर सम प्रमाणात वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणखी ११०० स्टॅम्प कोषागारात शिल्लक असून, स्टॅम्प पेपरची टंचाई नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुद्रांक नाकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करू१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांना न देणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. स्टॅम्प पेपरची टंचाई नसून विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना स्टॅम्पची विक्री करावी.- आबासाहेब तुपे, दुय्यम निबंधक, पैठण 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभागFarmerशेतकरीStudentविद्यार्थी