कृत्रिम पावसाचे प्रयोग बंद, २८ कोटी रुपये पाण्यात
By Admin | Updated: October 22, 2015 20:54 IST2015-10-20T18:46:50+5:302015-10-22T20:54:55+5:30
राज्यसरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रीकडून समजले आहे. त्यामुळे २८ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.

कृत्रिम पावसाचे प्रयोग बंद, २८ कोटी रुपये पाण्यात
>ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.२० - राज्यसरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सुत्रीकडून समजले आहे. त्यामुळे २८ कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यासाठी मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्हा सेंटर येथील सुमारे २५० किलोमिटरच्या परिघात हा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग सुरु होता. यंदा राज्यात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी राज्यसरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला होता. पण आकाशात पावसाळी ढगच नसल्यामुळे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोग थांबवण्याचा शासनाने निर्णय घेतल्याचे समजते आहे.
१४ दिवसांपासून विमान उभे असून, आकाशात पावसाळी ढग नसल्यामुळे त्याचे कुठेही उड्डाण झालेले नाही. हवामान खात्याने मान्सून संपल्याचे जाहीर केले आहे. परिणामी, २८ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग आता थांबवावा लागणार आहे. प्रयोग संपण्याची अधिकृत तारीख ४ नोव्हेंबर जरी असली तरी आता पावसाळी ढग दाटून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रयोग आधीच गुंडाळण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात २००९ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता.