कृत्रिम पावसाची पुन्हा तयारी

By Admin | Updated: June 11, 2016 00:17 IST2016-06-10T23:56:52+5:302016-06-11T00:17:32+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाही कृत्रिम पावसाच्या सरी पाडण्यासाठी शासन पातळीवर हालचालींना वेग आला

Artificial rain again | कृत्रिम पावसाची पुन्हा तयारी

कृत्रिम पावसाची पुन्हा तयारी

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाही कृत्रिम पावसाच्या सरी पाडण्यासाठी शासन पातळीवर हालचालींना वेग आला असून, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) या विभागाने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कृत्रिम पाऊस व हवामानाचा अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या विमानाच्या पार्किंगसाठी १५ हजार स्क्वे. फूट जागेची मागणी केली आहे. या जागेत कायमस्वरूपी हवामान अभ्यास केंद्र कार्यरत होऊ शकते, अशी माहिती आयआयटीएम पुणे येथील सूत्रांकडून समजली आहे. कृत्रिम पाऊस आणि हवामानाचा अभ्यास या दोन्ही घटकांसाठी मराठवाड्यात कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राज्यात यंदा सरासरीपेक्षा १०६ टक्के पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून मान्सूनच्या मोसमातच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची लगबग वरिष्ठ पातळीवर सुरू झाली आहे. त्यासाठी पुन्हा विमान कंपनीचा शोध सुरू झाला आहे. या प्रयोगासाठी ३० कोटींहून अधिक खर्च केला जाण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात याप्रकरणी निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
आयआयटीएमकडे स्वत:चे विमान नसल्यामुळे खाजगी कंपनीची सेवा घ्यावी लागणार आहे.
गेल्या वर्षी सरकारने ख्याती वेदर मॉडिफि केशन कंपनीला ३ महिन्यांसाठी २०० तास उड्डाण करण्यासाठी २७ कोटी रुपये दिले होते. यातून कंपनीने ९० तासांच्या आसपास उड्डाण करून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला.
गेल्या वर्षी प्रयोगात वापरण्यात आलेल्या साधनसामग्रीने राज्यात किती कि़मी.मध्ये पाऊस पडला याची आकडेवारी चुकीची असल्याचे मत हवामानतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले होते. विमान पार्किंग, शास्त्रज्ञ, पायलटस्, तंत्रज्ञांचा आवास, निवास खर्चासह ते कंत्राट होते. आॅगस्ट २०१५ मध्ये २५४ मि. मी., सप्टेंबरमध्ये २५२ मि. मी. पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा करण्यात आला होता. आॅगस्टमध्ये ३४८, सप्टेंबरमध्ये २०१ असे ५४९ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात
आले.

Web Title: Artificial rain again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.