चढ्या दराने डिझेल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:06 IST2021-03-19T04:06:02+5:302021-03-19T04:06:02+5:30

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुक्तार शेख (रा. बालानगर) हा ढोरकीनच्या पंपावरून कॅनमध्ये डिझेल भरून ...

Arrested for selling diesel at inflated rates | चढ्या दराने डिझेल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याला अटक

चढ्या दराने डिझेल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याला अटक

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मुक्तार शेख (रा. बालानगर) हा ढोरकीनच्या पंपावरून कॅनमध्ये डिझेल भरून कारमध्ये घेऊन निघाला. या डिझेलची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याची माहिती एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्याला मिळाली. पोलिसांनी ही माहिती मिळताच त्यांनी सदर कारचा पाठलाग केला. त्याला बालानगर येथे मुद्देमालासह पकडले. ४० लीटर डिझेल कॅन किंमत ३५२० रुपये व कार (क्र. महा.१६ .के. ५०२३) ज्याची अंदाजे किंमत तीन लाख असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक केले. या प्रकरणी एमआयडीसी पैठण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स.पो.नि. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनेश दाभाडे, शरद पवार, विजय मोरे यांनी केली.

Web Title: Arrested for selling diesel at inflated rates