१५ किलो चांदीसह आरोपी जेरबंद

By Admin | Updated: September 8, 2015 00:36 IST2015-09-08T00:16:53+5:302015-09-08T00:36:58+5:30

सिल्लोड : येथील चिंतामणी ज्वेलर्सचे शटर उचकटून २ आॅगस्ट रोजी चोरट्यांनी हात साफ केला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून स्थानिक गुन्हे

Arrested with 15 kg silver | १५ किलो चांदीसह आरोपी जेरबंद

१५ किलो चांदीसह आरोपी जेरबंद


सिल्लोड : येथील चिंतामणी ज्वेलर्सचे शटर उचकटून २ आॅगस्ट रोजी चोरट्यांनी हात साफ केला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ किलो चांदीसह जालना येथून एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
किशोर रामसिंग टाक (रा. जालना) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २ आॅगस्ट रोजी सिल्लोड येथील सराफा मार्केटमधील चिंतामणी ज्वेलर्सचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.
दुकान मालक सुनील गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस करीत होते.
पोलीस निरीक्षक कांचन चाटे यांनी सापळा रचून या चोरीतील एका आरोपीला अटक केली. त्याचा साथीदार लालसिंग हा फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती कांचन चाटे यांनी
दिली.

Web Title: Arrested with 15 kg silver