न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स गायब करणाऱ्या आरोपीस अटक
By Admin | Updated: June 14, 2017 22:10 IST2017-06-14T21:04:42+5:302017-06-14T22:10:25+5:30
मागील आठवड्यात पाचोरा येथील न्यायाधिशांच्या पत्नीची पर्स सिल्लोड बस्थानकावर जळगाव बस मध्ये चढताना चोरट्यानी लांबविल्याची

न्यायाधीशांच्या पत्नीची पर्स गायब करणाऱ्या आरोपीस अटक
ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 14 - मागील आठवड्यात पाचोरा येथील न्यायाधिशांच्या पत्नीची पर्स सिल्लोड बस्थानकावर जळगाव बस मध्ये चढताना चोरट्यानी लांबविल्याची घटना घडली होती.या प्रकरणी पर्स चोरणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा पोलिसांनी बुधवारी औरंगाबाद येथे अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रमेश भगवान शिंदे वय 35 रा. मुकुंडवाडी औरंगाबाद असे आहे. त्यांच्या ताब्यातुंन काही चोरी गेलेला एवज पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भुजंग, फौजदार जाधव यांनी केली. आरोपीस पकडून त्यांनी सिल्लोड शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
पाचोरा येथे कार्यरत असलेले न्यायाधीश मोहमंद ताहेर बिलाल हे परिवार सोबत उन्हाळ्याच्या सुटित नांदेड़ येथे गेले होते.पाचोरा येथे परत जात असताना ते सिल्लोड बस्थानकावर थांबले होते. पहुर जाण्यासाठी ते व त्यांची पत्नी जळगाव बस मध्ये चढत असताना त्यांच्या पत्नी जवळ पिशवित ठेवलेली पर्स या चोरट्याने लांबविली होती.
चोरी गेलेल्या पर्स मध्ये 45 हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठन, 20 हजार रूपयांच्या सोन्याच्या बाळया, 15 हजारांच्या 2 अंगठ्या, चांदीची चैन, मोबाईल, रोख 700 रूपये असे 84 हजाराचा एवज होता.
बस मध्ये चढताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानी सिल्लोड शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात पोलिसांनी या आरोपीस अटक केली आहे.