फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:06 IST2021-04-30T04:06:13+5:302021-04-30T04:06:13+5:30
तालुक्यात बिल्डा येथे १४० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर आहे. यात आजच्या घडीला ४० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ...

फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची व्यवस्था
तालुक्यात बिल्डा येथे १४० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर आहे. यात आजच्या घडीला ४० रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ग्रामीण रुग्णालयात आणखी ३० बेडची व्यवस्था करण्यात आली असून ऑक्सिजन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या २ जम्बो सिलिंडर असून येत्या आठ दिवसांत आणखी सोळा सिलिंडर मिळणार आहेत. यामुळे रुग्णांना फायदा होईल, अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे यांनी दिली. कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, सभापती सविता फुके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित खंदारे, डॉ. सतीश साबळे, डॉ. अंगद घुले, डॉ. जगदीश सावंत, डॉ. भागवत सुलताने, डॉ. अतुल नीरवे, डॉ. शुभम तांदळे आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी आ. हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, डॉ. अभिजित खंदारे, डॉ. प्रसन्ना भाले.
290421\gramin rugnalay phu_1.jpg
फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरचे उद्घाटन प्रसंगी आ. हरिभाऊ बागडे, नगराध्यक्ष सुहास सिरसाठ, डॉ. अभिजित खंदारे, डॉ. प्रसन्ना भाले.