पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले घर
By Admin | Updated: August 10, 2014 02:21 IST2014-08-10T02:17:49+5:302014-08-10T02:21:55+5:30
लातूर : शहरातील पांडूरंग नगर भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून जवळपास २ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास

पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी फोडले घर
लातूर : शहरातील पांडूरंग नगर भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घर फोडून जवळपास २ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली़ याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
उध्दव शिवबा मलवाड हे आपल्या घरी झोपले असल्याचा फायदा घेत पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने जुन्या व नवीन घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला़ घरातील कपाटाचे कुलुप तोडले़ तसेच इतर साहित्याची फेकाफेक केली़ घरातील सोन्या-चांदीचे दागीने असा एकूण २ लाख २८ हजाराचा मुद्देमाल पळविला आहे़
ही बाब शनिवारी सकाळी लक्षात येताच मलवाड यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली़ याप्रकरणी उध्दव मलवाड यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून कलम ४५७, ३८० नुसार एमआयडीसी पोलिसात शनिवारी गुन्हा नोंद करण्यात आला़ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे़ पुढील तपास सपोउपनि़ घोडके करीत आहेत़ (प्रतिनिधी)