खरिपाचे क्षेत्र वाढले
By Admin | Updated: May 6, 2016 23:57 IST2016-05-06T23:47:15+5:302016-05-06T23:57:18+5:30
औरंगाबाद : खरीप हंगामामध्ये पिकांचे नियोजन, जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पीक पद्धतीत बदल, पावसाचा खंड किंवा उशिरा पाऊस आल्यास कोणती काळजी घ्यावी,

खरिपाचे क्षेत्र वाढले
औरंगाबाद : खरीप हंगामामध्ये पिकांचे नियोजन, जमिनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी पीक पद्धतीत बदल, पावसाचा खंड किंवा उशिरा पाऊस आल्यास कोणती काळजी घ्यावी, आंतरपीक पद्धतीचे फायदे अशा विविध बाबींवर शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद कृषी विभागाने हाती घेतला असून, पुढील आठवड्यापासून प्रत्येक तालुक्यातील प्रमुख ५-१० गावांमध्ये कृषी अधिकारी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी आनंद गांजेवार यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी ‘कमी खर्चात अधिक उत्पादन’ कसे घ्यावे, याबद्दल कृषी विभागाने एक अभियान हाती घेतले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच गावागावांत घेण्यात आलेल्या किसान सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. पुढील आठवड्यात गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ५-१० गावे निवडली जाणार आहेत.
ज्या गावांतील शेतकऱ्यांची ऐकून घेण्याची तयारी असेल, अशा गावांची निवड करून तालुका कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी हे तेथे जाऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधतील.
यामध्ये खरीप शेतीचे नियोजन कसे करावे, पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत कमी पावसात कोणते पीक उपयुक्त राहील, उशिरा पाऊस आल्यास कोणते पीक फायद्याचे राहील, जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कोणती पिके घ्यावी लागतील, कंपोस्ट खतांची निर्मिती आणि त्याचा वापर कसा करावा, आंतरपीक आदींबद्दल अधिकारी हे शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देतील.