चार बांधकामे स्थगित करण्यासाठी पुरातत्व विभागाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:04 IST2021-07-16T04:04:52+5:302021-07-16T04:04:52+5:30
दौलताबाद किल्ला हा ऐतिहासिक वास्तू असून तो पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. किल्ल्यापासून सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ...

चार बांधकामे स्थगित करण्यासाठी पुरातत्व विभागाची नोटीस
दौलताबाद किल्ला हा ऐतिहासिक वास्तू असून तो पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतो. किल्ल्यापासून सुमारे दोनशे मीटर अंतरापर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास प्रतिबंध आहे. या अंतराच्या कक्षेत दौलताबाद गावातील मोमीनपुरा, छोटीमंडी, गवळीवाडा, कसाबमोहल्ला, भीमनगर असे अर्धे गाव येते. येथील कोणत्याही बांधकामाला पुरातत्व विभागाचा विरोध आहे. जेव्हा जेव्हा या भागातील नागरिकांनी घरांची बांधकामे, डागडुजी हाती घेतली, तेव्हा पुरातत्व विभागाने या व्यक्तींसह ग्रामपंचायतीलाही नोटिसा बजावल्या असून तहसीलदार, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनाही याबाबत माहिती दिली जाते. गेल्या वीस वर्षांपासून हे प्रकार सुरू आहेत. या विरोधानंतरही या भागातील नागरिकांनी बांधकामे पूर्ण केली आहेत. सध्याही चार जणांची बांधकामे सुरू असून पुरातत्व विभागाने ती थांबविण्यासाठी नोटीस बजावली आहे. हे प्रकरण दौलताबाद पोलीस स्टेशनअंतर्गत येत असल्याने पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.
कोट
यासंबंधी पुरातत्व खात्याची नोटिस अद्यापही आम्हाला मिळाली नाही. मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.
-पवन गायकवाड, सरपंच, दौलताबाद