मंजूर पदे २५; पंधरा कार्यरत

By Admin | Updated: May 21, 2014 00:17 IST2014-05-20T23:54:35+5:302014-05-21T00:17:18+5:30

कळंब : येथील उपाधीक्षक कार्यालयात सध्या कर्मचार्‍यांची चणचण जाणवत आहे

Approved posts 25; Fifteen working | मंजूर पदे २५; पंधरा कार्यरत

मंजूर पदे २५; पंधरा कार्यरत

 कळंब : येथील उपाधीक्षक कार्यालयात सध्या कर्मचार्‍यांची चणचण जाणवत आहे. या कार्यालयाकरिता २५ अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे मंजूर असताना आजघडीला केवळ १५ कर्मचार्‍यांवर कारभार सुरु आहे. त्यामुळे जमीन मोजणीची अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे पहावयास मिळत आहे. जमीन मोजणी संदर्भात शेतकर्‍यांकडून येणार्‍या तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात या उद्देशाने तालुकास्तरावरही भूमी अभिलेख कार्यालय सुरु करण्यात आले. जमीन मोजणी, तातडीची मोजणी, अतितातडीची मोजणी असे तीन प्रकार पाडून त्यानुसार फीस आकारली जाते. जमीन मोजणी झाल्यानंतर खरे चित्र समोर येते. परिणामी भांडण-तंटेही तेथेच मिटतात. या कार्र्यालयाकडे एवढी मोठी जबाबदारी असतानाही याठिकाणी मात्र कर्मचार्‍यांची वानवा आहे. कार्यालयासाठी अधिकारी, कर्मचारी व शिपायांची मिळून २५ पदे मंजूर आहेत. मात्र सद्यस्थितीला कार्यालयात १५ च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचार्‍यांची वानवा असल्याने जमीन मोजणीसंदर्भातील शेकडो प्रकरणे आज निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. जमिनीची मोजणी होऊन ८ ते ९ महिन्याचा कालावधी लोटला असतानाही संबंधित शेतकर्‍यांना निर्र्णय मिळू शकलेला नाही. जमीन मोजणीसाठी अर्ज केलेले शेतकरी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. तातडीने जमिनीची मोजणी करुन द्या, अशा स्वरुपाची विनवणी करीत आहेत. मात्र उपस्थित अधिकारी कर्मचार्‍यांची वानवा असल्याचे सांगत आहेत. हे उत्तर मागील अनेक महिन्यांपासून शेतकर्‍यांना ऐकावे लागत आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांना आर्थिक व मानसिक त्रासाला शेतकर्‍यांना सामोरे जो लागत आहे. त्यामुळे सदरील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचार्‍यांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Approved posts 25; Fifteen working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.