निधी गेल्यानंतर कामांना मंजुरी
By Admin | Updated: November 18, 2014 01:12 IST2014-11-18T01:02:32+5:302014-11-18T01:12:07+5:30
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद शाळा दुरुस्तीसाठी निधी द्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहात आकांडतांडव करणारे गोंधळी सदस्य, सत्ताधारी आणि अधिकारी यांच्या अकार्यक्षम कारभाराचे अजब नमुने समोर येत आहेत.

निधी गेल्यानंतर कामांना मंजुरी
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
शाळा दुरुस्तीसाठी निधी द्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सभागृहात आकांडतांडव करणारे गोंधळी सदस्य, सत्ताधारी आणि अधिकारी यांच्या अकार्यक्षम कारभाराचे अजब नमुने समोर येत आहेत.
सन २०१२-१३च्या जिल्हा वार्षिक योजनेने नवीन शाळा खोल्या बांधकाम व खोल्या दुरुस्तीसाठी दिलेल्या निधीपैकी ५ कोटी ७४ लाख ४५ हजार रुपयांचा निधी दोन वर्षे अखर्चित राहिल्याने परत गेला; परंतु याचे काहीही भान नसलेल्या या कारभाऱ्यांनी त्यानंतरही या हेडखाली कामांना प्रशासकीय मंजुरी देत पावणेसहा कोटी रुपयांचे देणे वाढवून ठेवले आहे.
अकार्यक्षम पदाधिकारी व निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे समाज कल्याण विभागाचा १७ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी गेल्या दोन वर्षांपासून अखर्चित राहिल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. आता शिक्षण विभागासाठी देण्यात आलेला निधी परत गेल्याची माहिती समोर आली आहे. पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या या खाबुगिरीमुळे जिल्ह्यातील विकास कामांचे तीनतेरा झाले आहेत.
नवीन खोली बांधकामांच्या २२ कामांपैकी १४ कामांना दि.२७ डिसेंबर २०१२ रोजी मान्यता देण्यात आली. उर्वरित ८ कामांना चक्क दि. ६ जुलै २०१४ रोजी मान्यता देण्यात आली आहे. निधी परत गेल्यानंतर मंजुरी देण्यात आलेली कामे अशी :
जि.प.प्रशाला चिकलठाण (ता. कन्नड) ७ वर्ग खोल्या- खर्च २७ लाख ३० हजार
४जि.प.प्रशाला, अंधारी (ता.सिल्लोड)४ वर्ग खोल्या-खर्च १५ लाख ६० हजार
४जि.प.प्रशाला, शिवना (ता.सिल्लोड)४ वर्ग खोल्या-खर्च १५ लाख ६० हजार
जि.प.प्रशाला, सिल्लोड ७ वर्गखोल्या - खर्च २७ लाख ३० हजार
४जि.प.प्रशाला, फुलंब्री ६ वर्गखोल्या- खर्च २३ लाख ४० हजार
४जि.प.प्रशाला मांजरी (ता.गंगापुर) ७ वर्गखोल्या- खर्च -२७ लाख ३० हजार
जि.प.प्रशाला, वासडी (ता. कन्नड) ७ वर्गखोल्या-खर्च २७ लाख ३० हजार
४जि.प.प्रशाला, अंधानेर (ता.कन्नड) ७ वर्गखोल्या -खर्च २७ लाख ३० हजार