नऊ गावांच्या झोन प्लॅनला मंजुरी
By Admin | Updated: August 9, 2014 00:54 IST2014-08-09T00:42:17+5:302014-08-09T00:54:31+5:30
औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगतच्या नऊ गावांच्या सुनियोजित विकासासाठी नगररचना विभागाने तयार केलेल्या स्वतंत्र विकास आराखड्यास (झोन प्लॅन) जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारी मंजुरी दिली.

नऊ गावांच्या झोन प्लॅनला मंजुरी
औरंगाबाद : शेंद्रा औद्योगिक वसाहतीलगतच्या नऊ गावांच्या सुनियोजित विकासासाठी नगररचना विभागाने तयार केलेल्या स्वतंत्र विकास आराखड्यास (झोन प्लॅन) जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी गुरुवारी मंजुरी दिली. हा झोन प्लॅन सोमवारपासून अमलात येणार असून यामध्ये भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्ते आणि शहरस्तरीय विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शेंद्रा परिसरात लवकरच सुनियोजित शहर अस्तित्वात येऊ शकणार आहे.
औरंगाबाद शहरापासून जवळच असल्यामुळे शेंद्रा एमआयडीसी परिसराची झपाट्याने वाढ होत आहे. एमआयडीसीलगतच्या गावांत मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. पुढील काही वर्षांत या परिसराला नागरी स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.