शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी

By admin | Updated: August 27, 2014 23:37 IST

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजनेअंतर्गत बी.पी.एल.च्या नवीन ४५० घरकुलांना मंजुरी दिली.

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजनेअंतर्गत बी.पी.एल.च्या नवीन ४५० घरकुलांना मंजुरी दिल्याची सभापती आशाताई भीमराव वायवळ व उपसभापती सचिन कांबळे यांनी दिली.शहर महानगरपालिका गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाज कल्याणची बैठक २५ आॅगस्ट रोजी सभापती आशाताई भीमराव वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. नगरसेविका अनिता सोनकांबळे यांनी सभागृहासाठी सतरंजा खरेदी करण्याच्या विषयावर सभागृहात मंजुरी द्यावी, अशी सूचना केली. त्यास नगरसेविका स्वाती खताळ यांनी अनुमोदन दिले. रमाई घरकुल योजनेत ८० फाईली पेन्डींग असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शेख अकबर यांनी दिली. त्यावर आशाताई वायवळ यांनी ए.पी.एल. आणि बी.पी.एल.च्या ज्या फाईली पेंडींग किंवा त्रुटीत असतील तर त्यांचे कागदपत्र मागवून घ्या, अशा सूचना केल्या. कस्तुराबाई कांबळे यांनी सांगितले की, माझ्या प्रभागात १० घरकुलाच्या फाईल पेंडींग आहेत. नगर रचना विभागाने काहीही अभिप्राय न दिल्याने त्रुटी आहेत. या विषयावर शहर अभियंता रमेश वाघमारे यांना नगर रचना विभागाकडून त्रुटी दूर करुन त्वरीत निकाली काढाव्यात, असे आदेश दिले. दरम्यान, अनेक बी.पी.एल.धारक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. यासाठी नवीन घरकुल प्रस्ताव त्वरीत मागवावेत, अशी मागणी अनिता सोनकांबळे, आकाश लहाने यांनी केली. यावर उपसभापती सचिन कांबळे यांनी नवीन अर्ज बीपीएल धारकांना द्यावेत, अशा सूचना केल्या. शहरातील बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुल योजनेची माहिती नसते. नवीन घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांचे नाव बीपीएल यादीत असणे आवश्यक आहे. स्वत:ची जागा, पी.आर. कार्ड किंवा रजिस्ट्री, घरपट्टी, नमुना नं.८ ची नक्कल आणि परभणी शहरातील रहिवासी असणे आवश्यक आहे, अशी माहिती उपसभापती सचिन कांबळे यांनी दिली. याविषयावर बोलताना सभापती आशाताई भीमराव वायवळ यांनी सांगितले की, नवीन ४५० घरकुल दिले जाणार आहेत. यासाठी १ सप्टेंबर २०१४ पासून घरकुलांचे अर्ज देण्यात येणार आहेत. तेव्हा महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. ज्यांच्या पूर्वीच्या फाईलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्रुटीची पूर्तता करावी. सर्वांच्या फाईली टप्प्या-टप्प्याने काढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. नगरसेवक विश्वजित बुधवंत, तिरुमला खिल्लारे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस शहर अभियंता रमेश वाघमारे, नगर रचना विभागाचे रईस खान, आरेस खान, फेरफार विभागाचे प्रमुख श्रीपाद कुलकर्णी, लेखापाल यादव, सचिव चंद्रकांत पवार, सुवर्ण जयंती विभागाचे भगवान शिंदे, सुनील झांबरे, नागसेन कांबळे, शिवशंकर डफुरे, पुष्पा बनसोडे, महेश मोरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)