शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी

By Admin | Updated: August 27, 2014 23:37 IST2014-08-27T23:28:39+5:302014-08-27T23:37:17+5:30

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजनेअंतर्गत बी.पी.एल.च्या नवीन ४५० घरकुलांना मंजुरी दिली.

Approval of new 450 households under city municipality | शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी

शहर मनपाअंतर्गत नवीन ४५० घरकुलांना मंजुरी

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने रमाई घरकुल योजनेअंतर्गत बी.पी.एल.च्या नवीन ४५० घरकुलांना मंजुरी दिल्याची सभापती आशाताई भीमराव वायवळ व उपसभापती सचिन कांबळे यांनी दिली.
शहर महानगरपालिका गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाज कल्याणची बैठक २५ आॅगस्ट रोजी सभापती आशाताई भीमराव वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. नगरसेविका अनिता सोनकांबळे यांनी सभागृहासाठी सतरंजा खरेदी करण्याच्या विषयावर सभागृहात मंजुरी द्यावी, अशी सूचना केली. त्यास नगरसेविका स्वाती खताळ यांनी अनुमोदन दिले. रमाई घरकुल योजनेत ८० फाईली पेन्डींग असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी शेख अकबर यांनी दिली. त्यावर आशाताई वायवळ यांनी ए.पी.एल. आणि बी.पी.एल.च्या ज्या फाईली पेंडींग किंवा त्रुटीत असतील तर त्यांचे कागदपत्र मागवून घ्या, अशा सूचना केल्या.
कस्तुराबाई कांबळे यांनी सांगितले की, माझ्या प्रभागात १० घरकुलाच्या फाईल पेंडींग आहेत. नगर रचना विभागाने काहीही अभिप्राय न दिल्याने त्रुटी आहेत. या विषयावर शहर अभियंता रमेश वाघमारे यांना नगर रचना विभागाकडून त्रुटी दूर करुन त्वरीत निकाली काढाव्यात, असे आदेश दिले. दरम्यान, अनेक बी.पी.एल.धारक लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. यासाठी नवीन घरकुल प्रस्ताव त्वरीत मागवावेत, अशी मागणी अनिता सोनकांबळे, आकाश लहाने यांनी केली.
यावर उपसभापती सचिन कांबळे यांनी नवीन अर्ज बीपीएल धारकांना द्यावेत, अशा सूचना केल्या. शहरातील बऱ्याच लाभार्थ्यांना घरकुल योजनेची माहिती नसते. नवीन घरकुल योजनेसाठी २ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांचे नाव बीपीएल यादीत असणे आवश्यक आहे. स्वत:ची जागा, पी.आर. कार्ड किंवा रजिस्ट्री, घरपट्टी, नमुना नं.८ ची नक्कल आणि परभणी शहरातील रहिवासी असणे आवश्यक आहे, अशी माहिती उपसभापती सचिन कांबळे यांनी दिली.
याविषयावर बोलताना सभापती आशाताई भीमराव वायवळ यांनी सांगितले की, नवीन ४५० घरकुल दिले जाणार आहेत. यासाठी १ सप्टेंबर २०१४ पासून घरकुलांचे अर्ज देण्यात येणार आहेत. तेव्हा महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. ज्यांच्या पूर्वीच्या फाईलमध्ये काही त्रुटी असतील तर त्यांनी लवकरात लवकर त्रुटीची पूर्तता करावी. सर्वांच्या फाईली टप्प्या-टप्प्याने काढणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
नगरसेवक विश्वजित बुधवंत, तिरुमला खिल्लारे यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस शहर अभियंता रमेश वाघमारे, नगर रचना विभागाचे रईस खान, आरेस खान, फेरफार विभागाचे प्रमुख श्रीपाद कुलकर्णी, लेखापाल यादव, सचिव चंद्रकांत पवार, सुवर्ण जयंती विभागाचे भगवान शिंदे, सुनील झांबरे, नागसेन कांबळे, शिवशंकर डफुरे, पुष्पा बनसोडे, महेश मोरे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Approval of new 450 households under city municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.