शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ‘उर्दू’ येत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या; खंडपीठाची राज्य शासनास नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 19:55 IST

शिक्षकाला भाषेचे ज्ञान नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजीनगर : ‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ‘उर्दू’ अवगत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्यांबाबत आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. जी. मेहरे आणि न्या. शैलेष ब्रह्मे यांनी राज्य शासन, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद, विभागीय आयुक्त जालना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. त्यांना ५ मार्चपर्यंत उत्तर दाखल करावयाचे आहे.

काय आहे याचिका?अमानुल्ला खान हारुन खान, रईस इद्रिस शेख व शाहिद खान पाशा खान यांनी ॲड. संभाजी मुंडे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेनुसार जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नेर, दानापूर आणि वालसावंगी या गावातील ‘उर्दू माध्यमा’च्या शाळांमध्ये ती भाषाच अवगत नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ‘त्या’ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून उर्दूचे ज्ञान असलेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याची विनंती करणारी निवेदने पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही कारवाई झाली नाही. म्हणून त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

आक्षेप काय?नियुक्त केलेल्या शिक्षकांना उर्दू भाषेत शिकविले जाणारे सर्व विषय शिकवावे लागतात. पाठ्यपुस्तके उर्दू भाषेत आहेत. शिक्षकाला भाषेचे ज्ञान नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. दानापूर येथील शाळेत इंग्रजी भाषा विषय असलेल्या शिक्षकाची नियुक्ती केली आहे.

कोण आहेत पात्र?उमेदवाराने दहावी आणि बारावीपर्यंतचे शिक्षण ज्या माध्यमातून घेतले असेल किंवा अध्यापन पदविका ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली असेल, त्यापैकी एका माध्यमाच्या प्राथमिक शाळेत उमेदवार अध्यापन करण्यास पात्र असेल, असे २८ ऑगस्ट २००१च्या शासनच्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच दहावीच्या शालांत परीक्षेतील प्रथम भाषेसाठी असलेले माध्यम नियुक्तीसाठी विचारात घेतले जाणार नाही, असे दि. १८ सप्टेंबर २०२३ च्या परिपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठEducationशिक्षण