शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

पराभूत उमेदवारांकडून 'ईव्हीएम' तपासणीसाठी आले अर्ज; जाणून घ्या तपासणी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 15:41 IST

मॉक पोलसारखीच असेल प्रक्रिया, जाणून घ्या कशी करणार ईव्हीएम मशीनची तपासणी

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चार उमेदवारांनी १२ ईव्हीएम मशीनची पडताळणी करण्याच्या मागणीसाठी ५ लाख ६६ हजार ४०० रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी याबाबतची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविली आहे. नवीन वर्षांत म्हणजेच जानेवारी २०२५ मध्ये ईव्हीएम तपासणीची तारीख निश्चित होणे शक्य आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांच्या समोर मतदान, मतमोजणीची प्रक्रिया घेतली जाईल.

निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारास एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांच्या ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी करता येते. त्यानुसार सहा जणांनी ईव्हीएम मशीन तपासणीची मागणी केली होती. त्यातील दोघांचे अर्ज फेटाळले तर औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे उद्धवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी ६ मशीनसाठी २ लाख ८३ हजार रुपये भरले. औरंगाबाद मध्यचे उमेदवार बाळासाहेब थोरात आणि एमआयएमचे नासेर सिद्दीकी व वैजापूरचे डॉ. दिनेश परदेशी यांनी २ मशीनच्या पडताळणीसाठी ९४ हजार ४०० रुपये भरले.

मॉक पोलसारखीच असेल प्रक्रियाजिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, भेल (भारत इलेक्ट्राॅनिक लि.) च्या अभियंत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी मागणी केलेल्या मतदान केंद्राच्या ईव्हीएम मशीन गोदामातून बाहेर आणल्या जातील. मशीनमधील सर्व जुना डेटा डिलीट करण्यात येईल. बॅलेट युनिटवर डमी मतपत्रिका चिटकविण्यात येईल. त्यानंतर मॉकपोलसारखीच मतदान प्रक्रिया राबविण्यात येते. प्रत्येक मशीनवर १४०० मतदान केले जाते. केलेल्या मतदानाची नोंद ठेवली जाते. त्यानंतर मतमोजणी प्रक्रियेप्रमाणेच मोजणी होते. उमेदवारांना टाकलेले मत मशीनमध्ये नोंदविले की नाही, हे तपासण्यात येते. शेवटी व्हीव्हीपॅटमधील चिठ्यांचीही मोजणी करण्यात येते. उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणुकीत पडलेल्या मतांची, व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची तपासणी होत नाही.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024aurangabad-east-acऔरंगाबाद पूर्वvaijapur-acवैजापूरaurangabad-central-acऔरंगाबाद मध्य