स्वतंत्र कृउबासाठी अर्ज
By Admin | Updated: June 6, 2014 01:02 IST2014-06-06T00:19:50+5:302014-06-06T01:02:52+5:30
बोरी: जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोरी बाजार समिती वेगळी करावी, अशी मागणी करणारा अर्ज राकाँचे प्रदेश सचिव अजय चौधरी व जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी

स्वतंत्र कृउबासाठी अर्ज
बोरी: जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बोरी बाजार समिती वेगळी करावी, अशी मागणी करणारा अर्ज राकाँचे प्रदेश सचिव अजय चौधरी व जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे. या अर्जावर १६ जून रोजी म्हणणे मांडण्यासाठी तारीख देण्यात आली आहे.
२००४ मध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करुन बोरी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण केली होती. परंतु, बाजार समितीचे तत्कालीन सभापती आणि विद्यमान आमदार आणि संचालकांनी खंडपीठात अर्ज करुन या निर्णयास तात्पुरती स्थगिती मिळविली होती. या स्थगितीची मुदत संपल्यानंतरही बोरी बाजार समिती स्वतंत्र निर्माण केली नाही. त्यावर येथील राष्ट्रीवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अजय चौधरी व जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी बोरी व जिंतूर बाजार समिती स्वतंत्र करा, अशी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ २७ मे २०१४ रोजी संपलेला आहे. परंतु, जिंतूर- बोरी एकत्रीतरित्या नवीन निवडणूक घेण्यासाठी मतदार यादीसाठी जिल्हा उपनिबंधकांनी पत्र काढले असल्याने पुढील निवडणूक होणार आहे. परंतु, बोरी व परिसरातील अनेकांचे नुकसान या निवडणुकीमुळे होऊ शकते. त्यामुळे काढण्यात आलेल्या नोटीफिकेशननुसार आगामी निवडणूक घेण्यात येऊ नये आणि बोरी कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्ररित्या स्थापन करावी, या याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणात १६ जून रोजी सुनावणी होणार आहे. (वार्ताहर)
२००४ मध्ये तत्कालीन आ.कुंडलिकराव नागरे यांच्या पुढाकाराने बोरी ही स्वतंत्र बाजार समिती निर्माण झाली होती. त्यावेळी या बाजार समितीचे सभापती म्हणून देवरावअप्पा चौधरी यांनी चार महिने कामकाजही पाहिले आहे.