‘प्रभाग’साठी आज अर्ज भरणार
By Admin | Updated: April 27, 2016 00:34 IST2016-04-27T00:12:00+5:302016-04-27T00:34:03+5:30
औरंगाबाद : महापालिकेतील प्रभाग समिती सभापतीपदांसाठी २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

‘प्रभाग’साठी आज अर्ज भरणार
औरंगाबाद : महापालिकेतील प्रभाग समिती सभापतीपदांसाठी २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. सातारा, देवळाईत स्वतंत्र निवडणूक लढविल्यानंतर शिवसेना-भाजपने या निवडणुकीत युती केली आहे. मंगळवारी अर्ज विक्रीच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने ४ प्रभागांसाठी तर भाजपने ४ प्रभागांसाठी अर्ज घेतले. एमआयएमला एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे.
महानगरपालिकेच्या ९ प्रभागांसाठी २८ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या वतीने प्रभाग १ साठी मनीषा लोखंडे, प्रभाग-५ साठी भारती सोनवणे, प्रभाग-८ साठी स्मिता घोगरे, प्रभाग-९ साठी नितीन साळवी व भाजपच्या वतीने प्रभाग-२ साठी बबिता चावरिया, प्रभाग-४ साठी शोभा वळसे, प्रभाग-६ साठी ज्योती नाडे, प्रभाग-७ साठी विमल केंद्रे यांनी अर्ज घेतले आहेत.