शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला

By admin | Updated: June 22, 2016 00:57 IST

औरंगाबाद : सेव्हन हिल येथील मिळकतीबाबत जारी करण्यात आलेल्या भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी तिघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.

औरंगाबाद : सेव्हन हिल येथील मिळकतीबाबत जारी करण्यात आलेल्या भोगवटा प्रमाणपत्र प्रकरणी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी तिघा आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळून लावला.याप्रकरणी मनपा उपअभियंता भगवंत फड यांनी शेख रियाझ (कॉम्प्युटर आॅपरेटर, मनपा), जयराम बुळे (शिपाई) व दशरथ आदमाने यांच्याविरुद्ध सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार प्रवीण चौधरी यांनी भूखंड क्र. २ भूमापन क्र. १२३७४/१३, सेव्हन हिल कॉलनीच्या भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यांच्या प्रस्तावानुसार सहायक संचालक नगररचना बोंबले हे संबंधित भोगवटा प्रमाणपत्रासाठी मोजमाप घेण्यासाठी १८ मे २०१६ रोजी त्या ठिकाणी गेले असता प्रवीण चौधरी यांनी त्यांना मोजमाप घेण्यास मज्जाव केला. संबंधित मिळकतीबाबत भोगवटा प्रमाणपत्र आपल्याला मिळाले असल्याचे सांगितले. यावरून बोंबले यांनी चौधरी यांच्याकडे भोगवटा प्रमाणपत्र आदेश व नकाशाची मागणी केली असता त्यांनी छायांकित प्रती त्यांना दिल्या. त्यानंतर बोंबले यांनी सदरील कागदपत्राबाबत मनपा कार्यालयात चौकशी केली असता ही कागदपत्रे बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत हर्सूल येथे आहेत. सहायक सरकारी वकील एस. टी. शिरसाट यांनी आरोपींच्या जामिनाला विरोध केला.