हनुमान जन्मोत्सवाला गर्दी न करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:05 IST2021-04-24T04:05:11+5:302021-04-24T04:05:11+5:30

खुलताबाद : हनुमान जयंती दिवशी भद्रा मारूती मंदिर चोहोबाजूंनी बंद राहणार असून, या दिवशी कुठलाही धार्मिक कार्यक्रम ...

Appeal not to crowd Hanuman Janmotsava | हनुमान जन्मोत्सवाला गर्दी न करण्याचे आवाहन

हनुमान जन्मोत्सवाला गर्दी न करण्याचे आवाहन

खुलताबाद : हनुमान जयंती दिवशी भद्रा मारूती मंदिर चोहोबाजूंनी बंद राहणार असून, या दिवशी कुठलाही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याची भाविकांनी नोंद घ्यावी. तसेच दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे.

दिनांक २७ एप्रिल रोजी हनुमान जयंती असून, हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मोजक्याच विश्वस्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. खुलताबाद येथील भद्रा मारूती संस्थानमध्ये विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मिठ्ठू पाटील बारगळ, विश्वस्त माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, सचिव कचरू पाटील बारगळ, पोपटलाल जैन, भद्रा मारूती संस्थानचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी दिली आहे.

Web Title: Appeal not to crowd Hanuman Janmotsava