मराठा क्रांती मोर्चाचे गांधी यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:37 IST2017-09-09T00:37:18+5:302017-09-09T00:37:18+5:30
खा.राहुल गांधी हे दुपारी ३ वाजेच्या सुमारास सावली विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांना मराठा मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मराठा क्रांती मोर्चाचे गांधी यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खा.राहुल गांधी हे दुपारी ३ वाजेच्या सुमारास सावली विश्रामगृहावर आल्यानंतर त्यांना मराठा मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सावली विश्रामगृहावर प्रतिष्ठीत नागरिकांशी खा. गांधी यांनी संवाद साधला. यावेळी मराठा मोर्चाच्या वतीने मागण्यांचे निवेदन दिले. मराठा आरक्षणासंदर्भात लोकसभेमध्ये आवाज उठवावा तसेच कोपर्डी घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. निवेदन स्वीकारल्यानंतर खा. गांधी यांनी मराठा मोर्चासोबत चर्चा केली. यावेळी मराठा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.