काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहन
By Admin | Updated: April 12, 2015 00:49 IST2015-04-12T00:49:59+5:302015-04-12T00:49:59+5:30
जालना : भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ अ.भा. काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी दिल्ली येथे

काँग्रेसच्या महारॅलीत सहभागी होण्याचे आवाहन
जालना : भूसंपादन विधेयकाच्या निषेधार्थ अ.भा. काँग्रेस कमिटीच्या वतीने नवी दिल्ली येथे १९ एप्रिल रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले.
शनिवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात यानिमित्त झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे होते. यावेळी माजी आमदार सुरेश जेथलिया, शहराध्यक्ष अब्दूल हाफिज, अन्वर देशमुख, तालुकाध्यक्ष सुरेश तळेकर, विष्णू कंटुले, संदीप कड, पारसनंद यादव, सुभाष काटकर, साहेबराव साळवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष डोंगरे म्हणाले, कॉँग्रेस पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणी मोहीम पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेवून जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे आवाहन केले.
यावेळी सुखलाल राठोड, सुर्यभान मोरे, राजेंद्र जैस्वाल, सय्यद गणी, ज्ञानेश्वर डुकरे, परमेश्वर गोते, प्रमिला सूर्यवंशी, मंदा पवार, सादेक देशमुख, मंजीतराव टकले, निळकंठ वायाळ, विष्णूपंत चव्हाण, शिवाजी भडांगे, कैलास मुळे, बालाजी अडीयार, बी.के. म्हस्के, पांडुरंग छडीदार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)