घाटनांद्र्यात कृषी सेवा केंद्र चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:05 IST2021-06-20T04:05:16+5:302021-06-20T04:05:16+5:30
घाटनांद्रा येथील चार व आमठाण्यातील एक या प्रमाणे पाच कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी धुमाकूळ घालून लाखोचा ऐवज लंपास केला. ...

घाटनांद्र्यात कृषी सेवा केंद्र चालकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
घाटनांद्रा येथील चार व आमठाण्यातील एक या प्रमाणे पाच कृषी सेवा केंद्रात चोरट्यांनी धुमाकूळ घालून लाखोचा ऐवज लंपास केला. त्यातच काही दिवसांपूर्वी आणखी एक चोरीचा घटना घडली. त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. चोरट्यांचा शोध सुरू असून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता विविध उपाययोजना कराव्या, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांनी केले. घाटनांद्रा येथील कृषी सेवा केंद्रचालकांची बैठक घेऊन त्यांनी उपाययोजनाबाबत माहिती दिली. तर परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक आप्पा गुळवे, प्रवीण पाटणी, सचिन पाटणी, रामचंद्र मोरे, रघुनाथ मोरे, राहुल पाटणी, गणेश मनगटे, राजू पालोदकर, वामन मोरे, मोहम्मद पठाण, मुजीब मुल्ला, जमादार आकाश सोनवणे यांची उपस्थिती होती.
---
फोटो : घाटनांद्रा येथील कृषी सेवा केंद्र चालकांना मार्गदर्शन करताना नागरिक.
190621\datta revnnath joshi_img-20210618-wa0062_1.jpg
कृषी केंद्र चालकांना मार्गदर्शन करताना नागरिक,