औरंगाबाद : पुढील शैक्षणिक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तत्त्वज्ञान हा स्वतंत्र पदव्युत्तर विभाग सुरू केला जाणार आहे; पण महाविद्यालयीन स्तरावर हा अभ्यासक्रम कुठे शिकविला जातो, याबाबत विद्यापीठातील कोणताही अधिकारी ठोसपणे सांगू शकत नाही. त्यामुळे या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाला विद्यार्थी मिळतील का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पदवी अभ्यासक्रमामध्ये तत्त्वज्ञान विषय असला तरच तो या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल, हा गैरसमज दूर करावा. तत्त्वज्ञान विषयाला जागतिक पातळीवर फार महत्त्व आहे. कोणताही पदवीधर या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. आंतरविद्या शाखेच्या माध्यमातून कोणत्याही शाखेचा पदवीधर या विषयात उच्चशिक्षण घेऊ शकतो, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी सांगितले. या विद्यापीठाला नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाल्यापासून येथे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील शिक्षण मिळावे, असा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांचा आग्रह आहे. त्या अनुषंगानेच त्यांनी तत्कालीन कुलगुरूंनी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात असलेला नॅनो टेक्नॉलॉजी हा विषय जवळपास बंदच केला होता. तो विद्यमान कुलगुरूंनी केवळ सुरूच केला नाही, तर त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. या विभागांतर्गत आता विद्यापीठ परिसरातील भौतिक संपदेची माहिती अपडेट करून ती जतन केली जाणार आहे. याशिवाय तत्त्वज्ञान या विषयात पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमाची विद्यापीठात सुविधा नव्हती. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ परिसरात आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वतंत्रपणे तत्त्वज्ञान विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, इमारत व अन्य पायाभूत सुविधांसाठी विद्यापीठामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा करणारव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठ परिसरात आगामी शैक्षणिक वर्षापासून स्वतंत्रपणे तत्त्वज्ञान विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी, इमारत व अन्य पायाभूत सुविधांसाठी विद्यापीठामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
कोणताही पदवीधर घेऊ शकेल तत्त्वज्ञानामध्ये उच्चशिक्षण
By admin | Updated: July 28, 2014 01:05 IST
औरंगाबाद : पुढील शैक्षणिक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तत्त्वज्ञान हा स्वतंत्र पदव्युत्तर विभाग सुरू केला जाणार आहे;
कोणताही पदवीधर घेऊ शकेल तत्त्वज्ञानामध्ये उच्चशिक्षण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}