शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्याने घेतला आणखी बळी

By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST

पालम : तालुक्यातील रेवा तांडा गावाला जोडणारा रस्ता पाऊस पडताच वाहतुकीच्या लायकीचा राहत नाही.

पालम : तालुक्यातील रेवा तांडा गावाला जोडणारा रस्ता पाऊस पडताच वाहतुकीच्या लायकीचा राहत नाही. या खराब रस्त्यामुळे साप चावलेल्या रुग्णाला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्याने प्राण गमवावा लागला आहे. ही घटना १४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पालम तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेवा तांडा या गावाला जाण्यासाठी राणीसावरगावहून चार कि. मी. चा तर चाटोरी गावाहून ३ कि. मी. चा रस्ता आहे. परंतु हे दोन्ही रस्ते अतिशय खराब झाले आहेत. सदरील रस्त्यावर जागोजाग मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे. पाऊस पडताच चिखल तयार होऊन खड्यात पाणी साचते. यामुळे या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणी ठरत आहे. बैलगाडी वगळता वाहतुकीसाठी इतर पर्यायाचा वापर होणे मुश्कील झाले आहे.
१४ जुलै रोजी घरात जेवण करीत असताना चापला थायरू चव्हाण (वय ६०) या थैरूनाईक तांडा येथील रहिवाशाला सापाने उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. या रुग्णाला रेवा नाईक तांडा ते राणीसावरगाव रस्त्याने बैलगाडीत टाकून उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होते. बैलगाडीचा वेग कमी असल्याने रस्ता काटणे मुश्कील होते.
रस्त्याने जात असतानाच या रुग्णाने प्राण सोडला. खराब रस्त्याने या रुग्णाचा जीव घेतला आहे. या रस्त्याचे आता तरी मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी गोविंद चव्हाण, भगवान राठोड, संतोष राठोड, बंडू चव्हाण, बंडू चव्हाण, अंकूश राठोड, सोपान चव्हाण, बालाजी कवडे, निवृत्ती राठोड आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
वर्षापूर्वी गेला होता महिलेचा बळी
रेवा तांड्याच्या रस्त्याचा प्रश्न हा दोन जणांना जीव गमवावा लागला तरी मार्गी लागलेला नाही. मागील वर्षभरापूर्वी आॅगस्ट महिन्यात महिलेला प्रसुतीसाठी घेऊन जात असताना रस्त्यात वाहन फसल्याने महिलेचा जीव गेला होता. वर्षभरानंतर साप चावलेल्या रुग्णाचा उपचाराअभावी जीव गेलेला आहे. या गावातील ग्रामस्थांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना भेटून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. रस्त्याचा प्रश्न सोडविणे दूरच उलट सदरील लोकप्रतिनिधीने ग्रामस्थांची टिंगल केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती दिली आहे.
आंदोलनाचा इशारा
राणीसावरगाव ते रेवा तांडा या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केलेली आहे. परंतु या मागणीला प्रशासन व लोकप्रतिनिधीनी केराची टोपली दाखविलेली आहे. ग्रामस्थांनी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याचे काम करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.