काळविट शिकारप्रकरणी आणखी एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 05:29 IST2019-07-15T05:29:00+5:302019-07-15T05:29:04+5:30

काळविटांची शिकार करुन मेजवानी करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला वनविभागाच्या पथकाने शनिवारी रात्री चोरवाघलगाव शिवारात अटक केली.

Another person arrested for blackbuck hunting | काळविट शिकारप्रकरणी आणखी एकाला अटक

काळविट शिकारप्रकरणी आणखी एकाला अटक

वैजापूर (जि. औरंगाबाद) : हनुमंतगाव येथील वस्तीवर काळविटांची शिकार करुन मेजवानी करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला वनविभागाच्या पथकाने शनिवारी रात्री चोरवाघलगाव शिवारात अटक केली. योगेश अशोक मतकर (२०) असे त्याचे नाव असून तो हनुमंतगाव येथील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी या प्रकरणी संजय बाबूराव त्रिभुवन, गुलाब बाळासाहेब फुलारे यांना अटक झाली होती. नानासाहेब सोपान परडे, सचिन अशोक त्रिभुवन व रवी एकनाथ त्रिभुवन हे तीन आरोपी फरार आहेत. वनविभागाला कोठडी नसल्याने अटक केलेल्या आरोपींना कार्यालयातच ठेवले जाते.

Web Title: Another person arrested for blackbuck hunting