आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

By मुजीब देवणीकर | Published: June 8, 2023 02:10 PM2023-06-08T14:10:29+5:302023-06-08T14:12:27+5:30

‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले.

Another honor to Chhatrapati Sambhajinagar! 2 crore reward to Chhatrapati Sambhajinagar Municipality in 'Mazi Vasundhara' campaign | आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

आणखी एक मानाचा तुरा! 'माझी वसुंधरा' अभियानात छत्रपती संभाजीनगरला २ कोटींचे बक्षीस

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरू केले असून, या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सर्वोत्तम कामगिरीबद्दल २ कोटींचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मागील वर्षीही मनपाने दोन कोटींचा पुरस्कार पटकावला होता.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० पासून सुरू झाले. ‘माझी वसुंधरा ३.०’ अभियान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दि. १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४११ नागरी स्थानिक संस्था, १६,४१३ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. लोकसंख्यानिहाय ११ गटांतील विजेते निवडण्यात आले. ५ जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला असून, यामध्ये संभाजीनगर महापालिकेला विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महानगरपालिकेचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. अपर आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त सोमनाथ जाधव, उद्यान अधीक्षक विजय पाटील, शहर समन्वयक किरण जाधव, चेतन वाघ, स्वच्छता निरीक्षक विशाल खरात व संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन विभाग, उद्यान विभाग व ड्रेनेज विभाग यांनी यासाठी मेहनत घेतली.

शहराच्या जमेच्या बाजू: 
शहरातील विविध भागांत वृक्षारोपण, झाडे टिकविणे.
घनकचरा व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया प्रकल्प.
नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविणे.
शहर सौंदर्यीकरणाकडे गांभीर्याने दिलेले लक्ष.
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कारंजे व्हर्टिकल गार्डन.
खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीपणे पुढे नेणे.
पारंपरिक उर्जा स्रोतांचा वापर, विजेची बचत, सोलर पॅनल.

Web Title: Another honor to Chhatrapati Sambhajinagar! 2 crore reward to Chhatrapati Sambhajinagar Municipality in 'Mazi Vasundhara' campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.