आणखी १९ स्मार्ट बस दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 22:47 IST2019-01-28T22:46:30+5:302019-01-28T22:47:16+5:30
स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून आणखी १९ बस प्राप्त झाल्या. या बसची पासिंग, तपासणी करून रस्त्यावर येण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर एकूण ४३ बसेस रस्त्यावर धावतील.

आणखी १९ स्मार्ट बस दाखल
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत सुरू के लेल्या २३ स्मार्ट बस २३ जानेवारीपासून शहरात धावत आहेत. या बसला औरंगाबादकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. दररोज प्रवासी संख्या वाढत असून, यातून प्रतिदिन ७० हजार रुपयांची कमाई महापालिकेला होत आहे. सोमवारी टाटा कंपनीकडून आणखी १९ बस प्राप्त झाल्या. या बसची पासिंग, तपासणी करून रस्त्यावर येण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यानंतर एकूण ४३ बसेस रस्त्यावर धावतील.
स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने ३६ कोटी रुपये खर्च करून १०० छोट्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. टाटा कंपनी या बस तयार करीत आहे. पहिल्या टप्प्यात मनपाला २५ बस देण्यात आल्या. त्यातील दोन बस राखीव ठेवून २३ बस रस्त्यावर धावत आहेत. पहिल्याच दिवसापासून औरंगाबादकरांनी बससेवेला चांगला प्रतिसाद दिला. रविवारी ७० हजार रुपयांचा महसूल महापालिकेला प्राप्त झाला. हा प्रतिसाद पाहून एस. टी. महामंडळ आणि महापालिका खुश आहे. ज्या भागात शहर बस अद्याप सुरू झालेल्या नाहीत, त्या भागातही बससेवा सुरू करावी, अशी मागणी नगरसेवक, नागरिकांकडून होत आहे. मार्चअखेरपर्यंत टाटा कंपनी सर्व १०० बसेस मनपाला देणार आहे. त्यानंतरच सर्व शहरभर बससेवा सुरू होईल.
४० टक्क्यांनी प्रवाशांत वाढ
स्मार्ट सिटी योजनेतील बसला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख १४ मार्गांवरच बससेवा सुरू करण्यात आली आहे. बससेवा आणखी कुठे-कुठे हवी यासंदर्भात थेट प्रवाशांकडून माहिती घेणे सुरू आहे. बससेवा अधिक चांगली करण्यासाठी महामंडळ जोरदार प्रयत्न करीत आहे.
प्रशांत भुसारी, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ
-------------