शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
4
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
5
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
6
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
7
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
8
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
9
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
10
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
11
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
12
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
13
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
14
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
15
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
16
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
18
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
19
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
20
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे सन-२०२३ च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा

By बापू सोळुंके | Updated: July 8, 2023 20:48 IST

मसापच्यावतीने जाहीर झालेले हे पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका समारंभात प्रदान केले जाणार

छत्रपती संभाजीनगर:मराठवाडा साहित्य परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या विविध वाड्मय प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार प्रदान केले जातात. सन २०२२मध्ये प्रकाशित झालेलया पुस्तकांतून मसापच्यावतीने सन २०२३च्या ग्रंथ पुरस्काराची घोषणा अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केले. रोख तीन हजार रुपये आणि स्मृतीचिन्हं असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप आहेत. नरहर कुरुंदकर वाड्मय पुरस्कारासाठी भवान महाजन यांच्या 'रस्ता शोधताना'या आत्मपर लेखन असलेल्या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. डॉ. महाजन यांची 'मैत्र जीवाचे' आणि 'इये गोदायिचे काठी' ही पुस्तके प्रकाशित झालेली आहे. तीन हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्हं असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्राचार्य म.भि. चिटणीस वाड्मय पुरस्कारासाठी पुणे येथील विश्वास वसेकर यांच्या 'काव्यस्व' या समीक्षाग्रंथाची निवड करण्यात आली. वसेकर हे एक पत्रकार अन लेखक आहेत. कवी, ललीतगद्य लेखक व समीक्षक म्हूणन त्यांना ओळखले जातात. कै. कुसूमताई देशमुख वाड्मय पुरस्कारासाठी अजीम नवाज राही(रा.साखरखेर्डा, जि. बुलडाणा)यांच्या 'तळमळीचा तळ' या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. अजीम यांच्या नावावर व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार हे कवितासंग्रह आहेत.

बी.रघुनाथ कथा -कादंबरी पुरस्कार मराठीतील उत्कृष्ट कांदंबरीला देण्यात येतो. सीताराम सावंत(रा. इटकी, ता. सांगोला, जि. सोलापुर) यांच्या 'हरवलेल्या कथेच्या शोधात'या कथा संग्रहाची या पुरस्कारसाठी निवड करण्यात आली. सावंत यांची भूई, भूई ठाव दे , देशाेधडी, लगीन आणि नामदार या कादंबऱ्या प्रकाशित आहेत.

मराठीतील उत्कृष्ट नाटकाला अथवा नाट्यसंमीक्षेला दरवर्षी कुमार देशमुख नाट्य पुरस्कार प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी यंदा मुंबईतील विजयकुमार देशमुख यांच्या चल ऐश करले या नाटकाची निवड करण्यात आली आहे. प्रा. शेषराव मोहिते यांच्या अध्यक्षतेखालील आणि डॉ. यजद्रथ जाधव ,डॉ. ज्ञानदेश राऊत हे सदस्य असलेल्या समितीने ग्रंथ निवडल्याचे त्यांनी सांगितले.

१३ ऑगस्ट रोजी पुरस्कार वितरण समारंभमसापच्यावतीने जाहिर झालेले हे पुरस्कार १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी एका समारंभात प्रदान केले जाणार असल्याचे प्राचार्य ठाले पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रा.किरण सगर, डॉ.दादा गोरे, कुंडलिक अतकरे आणि डॉ. कैलास इंगळेउपस्थित होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादmarathiमराठीMarathwadaमराठवाडा