महायुती पुरस्कृत उमेदवाराची घोषणा

By Admin | Updated: June 17, 2014 01:12 IST2014-06-16T23:59:24+5:302014-06-17T01:12:20+5:30

लातूर : मनपाच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़

Announcement of Mahayuti rewarded candidates | महायुती पुरस्कृत उमेदवाराची घोषणा

महायुती पुरस्कृत उमेदवाराची घोषणा

लातूर : मनपाच्या प्रभाग १३ च्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे़ भाजपाच्या अधिकृत उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र रद्द झाल्याने महायुतीचा पाठिंबा कोणाला मिळणार, याविषयी गेल्या आठ दिवसांपासून चर्चा रंगली होती़ सोमवारी अपक्ष उमेदवार विठ्ठल भोसले यांना महायुती पुरस्कृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पप्पूभाई कुलकर्णी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले आहे़
भाजपा उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर तुल्यबळ उमेदवाराचा शोध महायुतीकडून सुरू होता़ शिवसेना जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी यांनी सोमवारी कपबशीच्या चिन्हावर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले विठ्ठल भोसले यांना महायुतीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहिर केले आहे़ त्यामुळे या प्रभागात काँग्रेसचे प्रफुल्ल कांबळे व महायुती पुरस्कृत विठ्ठल भोसले यांच्यात लढत होणार आहे़ अपक्ष डॉ़ विजय अजनीकर, शिवप्रसाद शृंगारे यांचेही आव्हान राहणार आहे़
महायुतीचे पदाधिकारी प्रचारात़़़
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पूभाई कुलकर्णी म्हणाले, महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे़ चर्चेनंतरच विठ्ठल भोसले यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे़ त्यांना निवडणून आणण्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी दोन दिवसांत प्रचारात सहभागी होणार आहेत़

Web Title: Announcement of Mahayuti rewarded candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.