नियमबाह्य भोजनाचा ठेका देण्याचा केला घाट
By Admin | Updated: July 17, 2017 00:33 IST2017-07-17T00:15:01+5:302017-07-17T00:33:49+5:30
हिंगोली : लातूर विभागातील सन २०१४-१५ मधील भोजन ठेक्याच्या निविदेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निविदाधारक मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांनी दिलेल्या कागदपत्राची चौकशी

नियमबाह्य भोजनाचा ठेका देण्याचा केला घाट
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लातूर विभागातील सन २०१४-१५ मधील भोजन ठेक्याच्या निविदेत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या निविदाधारक मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांनी दिलेल्या कागदपत्राची चौकशी न करता त्यांनाच नियम बाह्य भोजनाचा ठेका दिल्याचा आरोप शेख नईम शेख लाला यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनाचा ठेका देण्यासाठी दर वर्षी निविदा मागविल्या जातात. परंतु सन २०१६- १७ मध्ये निविदा तर मागविल्याच नाहीत. मात्र २०१४- १५ मध्ये प्रतिक्षेत असलेल्या मे. हिंदुजा इंटरनॅशनल प्रा. लि. मुंबई यांच्या कागदपत्राची कोणतीही शहानिशा करता नवीन भेजनाचा ठेका दिला आहे. तसेच या कंपनीचे मालक सच्चानंद ललवाणी व भागचंद ललवाणी यांच्या नावाने खोटे बॉण्ड पेपर बनवून एका व्यक्तिने खोटा करार नामा तयार करुन काम सुरु केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन गुन्हा दाखल करावा व सदरील कंपनीचा पुरवठ्याचा आदेश रद्द करुन नवीन निविदा प्रक्रिया घेण्याची मागणी शेख नईम शेख लाला यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.