ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा
By Admin | Updated: May 12, 2014 00:01 IST2014-05-11T23:46:27+5:302014-05-12T00:01:43+5:30
गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्या बसफेर्यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे.

ऐन लग्नसराईत बससेवेचा उडाला बोजवारा
गोरेगाव : सध्या लग्नसराई आणि उन्हाळी हंगाम सुरू असताना ये-जा करणार्या बसफेर्यांच्या अनियमिततेमुळे बससेवेचा बोजवारा उडाल्याचे चित्र गोरेगाव परिसरात पहावयास मिळत आहे. गत महिन्यापासून चाललेल्या परिवहन विभागाच्या कारभारामुळे बहुतांश बस फेर्या नियोजित वेळेत येत नाहीत. काही बसेस शेजारील गावातून परस्पर परतत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडून गैरसोय होत आहे. हिंगोली जिल्ह्याची राजकीय राजधानी संबोधल्या जाणार्या तसेच शेजारील ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावात लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. अशातच बाजारपेठ व व्यावहारिकदृष्ट्या सभोवतालच्या गावासाठी महत्वाच्या असलेल्या या गावात परिवहन विभागाच्या दुर्लक्षाने बससेवेचा बोजवारा उडाल्याने सामान्य प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. गोरेगाव येथे हिंगोली- वाशिम- रिसोड- जिंतूर ही जिंतूर आगाराची बसफेरी नियमित नियोजित वेळेत सुरू आहे; परंतु गत महिन्याभरापासून परिवहन कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे बस सेवेचे नियोजन बिघडलेले आहे. बहुतांश बसफेर्यांना नियोजित वेळेचे तारतम्य राहिलेले नसून बसेस अवेळी धावत आहेत. रिसोड आगाराच्या काही बसफेर्या शेजारील केंद्रा बु. या गावातूनच परस्पर परत जात आहेत. तर रात्री मुक्कामी येणार्या दोन्ही बसफेर्या गोरेगावात मुक्कामी न येता केंद्रा बु. व मन्नास पिंपरी येथे मुक्कामी थांबून परस्पर परतत आहेत. हिंगोली आगाराच्या बहुतांश बसफेर्या नियोजित वेळेत धावत असून आगाराकडून सदर मार्गावर पाठविण्यात येणार्या बसेस जुन्या असल्याने त्यामध्ये सतत बिघाड होतो. परिणामी बसफेर्यांच्या वेळेत अनियमितता येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाविलाजाने प्रवाशांना खाजगी वाहनांमधून धोक्याचा प्रवास करून पायपीट करावी लागत आहे. परिवहन मंडळाच्या या कारभारामुळे बससेवा कोलमडली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खाजगी वाहन धारकांना लग्नसराई हंगामाची सुगी साधण्यासाठी संधी मिळत आहे. मात्र प्रवाशांची होत असलेली पायपीट व गैरसोय पाहता राज्य परिवहन विभागाच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर) जिंतूरचीही बस थांबेना जिंतूर आगाराची गोरेगाव मार्गे सुरू असलेली जिंतूर, वाशिम बस फेरी कधी-कधी गोरेगाव येथे न थांबता कन्हेरगाव- सेनगाव रस्त्यावरून थेट परस्पर निघून जात आहेत. ५२ खेड्यांची बाजारपेठ असलेल्या गोरेगावातील लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.