प्राणी मात्र तहानलेले...

By Admin | Updated: June 16, 2014 01:10 IST2014-06-16T00:49:13+5:302014-06-16T01:10:31+5:30

कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांना पाणीटंचाई भेडसावू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत;

The animals just thirsty ... | प्राणी मात्र तहानलेले...

प्राणी मात्र तहानलेले...

कन्नड : गौताळा अभयारण्यातील प्राण्यांना पाणीटंचाई भेडसावू नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत; मात्र उपलब्ध उपाययोजनांची अंमलबजावणी होत नसल्याने प्राण्यांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.
अभयारण्यातील प्राण्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये आणि पाण्याच्या शोधात प्राण्यांनी मानवी वस्त्यांकडे जाऊ नये यासाठी अभयारण्यात बशीच्या आकाराचे कृत्रिम जलसाठे (वॉटर होल) बांधण्यात आले. त्या वॉटर होलमध्ये पाणी टाकण्यासाठी या विभागाला निधी लवकर मिळत नाही.
तथापि, अभयारण्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या तपासणी नाक्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वॉटर होलमध्ये मात्र भरपूर पाणी आहे. दर्शनी भागातील वॉटर होल पाण्याने भरलेले आहे. याचा अर्थ जंगलातील इतर वॉटर होलमध्येसुद्धा पाणी आहे, असे भासविण्याचा हा प्रयत्न असावा, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
वॉटर होल बऱ्याच ठिकाणी कोरडे
बऱ्याचशा वॉटर होलमध्ये पाणी सोडता यावे यासाठी विहिरीवरून पाईपलाईन करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी वॉटर होलजवळ पाण्याचे हापसे बसविण्यात आले आहेत. ही उपाययोजना करण्यात आली असली तरीही हे वॉटर होल एक तर कोरडे आहेत किंवा त्यामध्ये अल्प प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे.

Web Title: The animals just thirsty ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.