शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका,मदतनिसांचा मोर्चा

By admin | Updated: February 1, 2015 00:48 IST

लातूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी शनिवारी प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या उपस्थितीत

लातूर : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने विविध मागण्यासाठी शनिवारी प्रदेश अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या उपस्थितीत टाऊन हॉल मैदान ते जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला़ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाच्या वतीने आयएसओ दर्जाच्या अंगणवाड्यासाठीची सक्ती बंद करावी़ दर महिन्याच्या १० तारखेला मानधन द्यावे़ मानधन वाढीतील फरकाची थकबाकी देऊन सुधारीत दरानुसार मानधन द्यावे, सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनिसांना पेन्शन लागू करावे, मयत अंगणवाडी सेविका व मदतनिसाच्या वारसांना पेन्शन अंतर्गत विम्याचा लाभ मिळवून द्यावा, वर्षभरातील प्रलंबित प्रवास व विंधन देयके दर तीन महिन्यांनी अदा करावीत़ एसएससी उत्तीर्ण झालेल्या अंगणवाडी कार्यकर्तींच्या मानधनात ५० रुपयांची वाढ करण्यात यावी, अंगणवाडी कार्यकर्तींनी ५ वर्ष किंवा १० वर्ष सेवा पूर्ण केल्यास त्यांच्या मानधनात ३१ व ६३ रुपयाने वाढ होते, ती थकीत मानधनवाढ देण्यात यावी़ विविध कार्यक्रमानिमित्त होणारा फोटो, अल्पोपहार व सत्कार आदीसाठी बजट उपलब्ध करुन द्यावे, दरवर्षी दिवाळीला अंगणवाडी, सेविका व मदतनीस यांना १ हजार रुपयाची भाऊबीज भेट देण्यात यावी़ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांना देण्यात येणारी खातेबाह्य कामे देऊ नयेत़ अंगणवाडी व कार्यकर्तींच्या समस्या सोडविण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठका घ्याव्यात, अंगणवाडी भरविण्याच्या वेळेत समानता यावी, आदी मागण्यांचा समावेश आहे़ या मागण्यांसाठी शहरातील टाऊन हॉल मैदानाहून जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे यांना निवेदन देण्यात आले़ या निवेदनाच्या प्रती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, एकात्मिक बालविकास योजनेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत़ या मोर्चाला जिल्ह्यातील दीड हजार अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिसांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)