...अन् सीएस आले ताळ्यावर !

By Admin | Updated: January 8, 2015 00:59 IST2015-01-08T00:32:42+5:302015-01-08T00:59:31+5:30

बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाला मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी कुलूप ठोकले होते.

... and the CS comes in handy! | ...अन् सीएस आले ताळ्यावर !

...अन् सीएस आले ताळ्यावर !


बीड : येथील जिल्हा रुग्णालयातील तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयाला मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी कुलूप ठोकले होते. त्यामुळे जि. प. कर्मचारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यातील बेबनाव चव्हाट्यावर आला होता. बुधवारी अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे ताळ्यावर आले आणि त्यांनी टाळे उघडले.
जिल्हा रुग्णालयामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये बीड तालुक्यातील चौसाळा, लिंबागणेश, नाळवंडी, पिंपळनेर, येळंब, साक्षाळपिंप्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गरोदर माता व बालकांसाठी दिल्या जाणाऱ्या पोलिओ, डीसीजी, टीटी, डीपीटी अशा लसींचा साठा ठेवलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयाची जागेची मालकी व वीज जोडणी जि. प. च्याच नावे आहे. असे असतानाही डॉ. बोल्डे यांनी ही जागा जिल्हा रुग्णालयाला द्यावी, अशी मागणी केली होती. येथील कार्यालयावर जि. प. ने आतापर्यंत पाच लाख रुपयांचा खर्च केलेला आहे. त्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला होता. मंगळवारी बोल्डे यांनी टोकाचा निर्णय घेत कार्यालयाला टाळे लावले. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. शिवाय तालुका आरोग्य अधिकारी कासट यांनी सीईओ, डीएचओ यांना पत्र लिहून घडला प्रकार कळविला होता. सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. चर्चेअंती एक खोली जिल्हा रूग्णालयाला देण्याचे ठरले. डॉ. बोल्डे यांच्याशी संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: ... and the CS comes in handy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.