अनुकंपा तत्त्वावर होणार नोकर भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:05 IST2017-07-26T01:04:06+5:302017-07-26T01:05:05+5:30
परभणी : शहर महापालिकेमध्ये अनुकंपातत्वावर असलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचा प्रशासकीय विभाग कामाला लागला आहे.

अनुकंपा तत्त्वावर होणार नोकर भरती
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहर महापालिकेमध्ये अनुकंपातत्वावर असलेल्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सेवेत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यानुसार महापालिकेचा प्रशासकीय विभाग कामाला लागला आहे.
महानगरपालिकेमध्ये सेवेत असताना कर्मचाºयाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसास सेवेमध्ये घेतले जाते. महानगरपालिकेच्या स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासन, विद्युत अशा वेगवेगळ्या विभागातील अनुकंपाधारकांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार २० उमेदवार प्रतीक्षा यादीत असून त्यापैकी १४ उमेदवारांना सेवेत घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. वर्ग ३ ची चार पदे आणि वर्ग ४ ची १० पदे भरली जाणार आहेत. या उमेदवारांच्या चारित्र्य प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांची यादी पोलीस प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सांकडे पाठविण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच अनुकंपातत्वारील भरती होण्याची शक्यता आहे.