शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी हनुमानाला केला जलाअभिषेक

By admin | Updated: August 6, 2014 02:19 IST

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर

एकुर्का रोड : भगीरथाने महाकष्टाने पृथ्वीवर गंगा आणल्याचे पुराणात सांगितले जाते़ मात्र यंदाचा दुष्काळ संपून वरूणराजा प्रसन्न व्हावा म्हणून उदगीर तालुक्यातील सुकणी येथील युवकांनी गंगाखेडपर्यंत ८५ किमीचे अंतर पदयात्राकाढून गोदावरी नदीच्या पाण्याने हनुमानाला अभिषेक केला़सविस्तर वृत्त असे की, पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्याप मोठा पाऊस झालेला नाही़ पूनर्वसू नक्षत्राच्या सुरूवातीला या भागात दोन मोठे सडाके (पाऊस) झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने चाढ्यावर मुठ धरली़ नंतरच्या काळात पाऊस झाला नसल्याने कोवळी पिके मान टाकून देऊ लागली आहेत़ जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न भेडसाऊ लागला आहे़ ही परिस्थिती विदारक असल्याने उदगीर तालुक्यातील सुकणी गावातील २०-२५ युवक एकत्र येऊन वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी नदीच्या पाण्याने अभिषेक करण्याची संकल्पना मांडली़ शुक्रवारी संध्याकाळी गंगाखेड येथे ही मंडळी पोहचली़ रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी तेथून नदीचे जल घेऊन ही मंडळी ८५ कि़मी़अंतर चालत जाण्याचा निर्णय घेतला़ खांद्यावर गंगाजल, हरिनामाचा गजर अन् टाळ मृदंगाच्यासाथीने ही मंडळी मजल दर मजल करीत सुकणी गावात शनिवारी सायंकाळी ६ वाजता दाखल झाल्याने गावच्या शिवारात या मंडळीचं मोठ्या मानाने ग्रामस्थांने स्वागत करून गावात वाजत गाजत आणले़ संध्याकाळी पूजा, होम हवन करून विधीव हनुमानाला जलाने अभिषेक करून पाऊस पडावा म्हणून साकडे घातले़ शेवटी परूचा (गावजेवनाचा) कार्यक्रम घेण्यात आला़ श्रावणातील पहिल्या सोमवारपासून गावातील सुर्यकांत सुकणे हे विणा घेऊन मंदिरात उभे आहेत़ जो पर्यंत पाऊस पडत नाही तो पर्यंत हा विणा घेऊन व एकवेळ जेऊन उपवास करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे़ हे विशेष़़़