शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव : आंबेडकर

By admin | Updated: August 13, 2015 00:22 IST

उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता.

उस्मानाबाद : गुजरात शासनाने पाठ्यपुस्तकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धडा मागे घेतला आहे. या धड्यामध्ये धर्मांतरण तसेच २२ प्रतिज्ञांचा उल्लेख होता. देशातल्या परंपरेचा त्याग कशासाठी केला याची कारणमिमांसाही त्यामध्ये करण्यात आली होती. हा एकप्रकारे देशाचे निधर्मी स्वरुप बदलण्याचा डाव असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.बुधवारी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासह डॉ. भारत पाटणकर, कॉ. सुबोध मोरे तसेच डाव्या चळवळीतील पदाधिकारी, नेत्यांनी तालुक्यातील अनसुर्डा गावास भेट देवून पिडीत कुटुंबियांशी चर्चा केली. त्यानंतर ते ‘लोकमत’शी संवाद साधत होते. या देशाला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. गौतम बुद्धही याच परंपरेतील होते. मागील काही वर्षांपासून संतांची परंपरा नाकारण्याचा प्रयत्न काही संस्था तसेच धार्मिक संघटना जाणीवपूर्वक करीत असून, देशाची असलेली निधर्मी ओळख पुसून देशाला वैदिक हिंदू राष्ट्र दाखविण्याचा डाव यामागे असल्याचा ते म्हणाले. गुजरात शासनाने डॉ. आंबेडकरांचा पाठ्यपुस्तकातील धडा वगळून यात आता शासनही सहभागी होत असल्याचे दाखवून दिल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. या प्रकाराबाबत गुजरातमध्ये तेथील संघटना आंदोलन उभारत असून, हा प्रश्न आम्ही लोकांमध्ये घेऊन जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. या प्रकारावरुन शासनाने फॅसिझमकडे सुरुवात केली असल्याचा आरोप करीत, आम्हाला पाहिजे ते मान्य आणि आम्हाला मान्य तेच तुम्ही मान्य केले पाहिजे, अशी हुकूमशाही वृत्ती यामागे असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. अशा पद्धतीच्या हुकूमशाही वृत्तीशी लढण्याशी लोक जागृती महत्वाची असून, यासाठीच यापुढील काळात काम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.अनसुर्डा येथील अत्याचार प्रकरण गंभीर आहे. आम्ही सांगतो तेच तुम्ही ऐकले पाहिजे, अशा पद्धतीची मनोवृत्ती तेथे दिसून आली. याप्रकरणामध्ये संपूर्ण गावाचा सहभाग नसून, त्या गावातील काही मोजकी मंडळी या कष्टकरी कुटुंबियांचा छळ करीत आहेत. याच मोजक्या मंडळीच्या दबावाखाली तेथील पिडित ११ कुटुंबासह गावातील इतर कुटुंबेही असून, याप्रकरणी न्याय मिळावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. धार्मिक भावना रुजविण्यासाठी मुस्लिमांना तर जातीची भावना समाजात रुजविण्यासाठी दलितांना टार्गेट केले जात आहे. सदर गावातील प्रकार काही महिन्यांपासून सुरु असताना मुख्यमंत्र्यांसह एकाही मंत्र्याने तेथे भेट दिलेली नाही. हा प्रकार दुर्दैैवी असल्याचे ते म्हणाले.